खराडी - पुणे-नगर महामार्गावर खराडी जनक बाबा दर्गाजवळील आपले घर सोसायटीसमोर बीआरटी मार्गामध्ये पीएमपीच्या दोन बसची समोरासमोर ध़डक बसून वाहक-चालकासह २५ प्रवासी जखमी झाले.
सर्व जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असून, जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून यात कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ( pmc )
पुणे-नगर महामार्गावर बीआरटी मार्गामध्ये पीएमपी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही बसेसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका तसेच पीएमपीएल व बीआरटीचे अधिकारी दाखल झाले.
नरवीर तानाजी वाडी डेपोची सीएनजी बस ६५९ मार्ग क्रमांक १५९/९ हि तळेगाव ढमढेरे येथून पुणे महानगरपालिकेकडे येत असताना, खराडी येथील जनक बाबा दर्ग्याच्या अलीकडे असलेल्या आपले घर सोसायटीसमोर बीआरटी मार्गामध्ये विरुद्ध दिशेने जाणारी वाघोली डेपोची बस क्रमांक ई १६४ मार्ग क्रमांक २३६/२ ही बस वेगात येऊन समोरच्या बसला धडकली.
यामध्ये दोन्ही बसचे चालक व वाहक यांच्यासह २९ प्रवासी जखमी झालेले आहेत. जखमींच्या हाताला तोंडाला व पायाला मार लागलेला आहे. सध्या कोणाची ही प्रकृती गंभीर नसून योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. अपघातानंतर बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून व मिळेल त्या वाहनांमधून जखमींना ससून रुग्णालयात नेण्यात आले. सर्वांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या अपघातानंतर पुणे- नगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या बस समोरासमोर येऊन एकमेकांना इतक्या जोरात आदळेपर्यंत चालकांना कसे लक्षात आले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पीएमपीएल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश असून सतरा प्रवासी व दोन्ही चालक व दोन्ही वाहक आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही.
खराडी - पुणे-नगर महामार्गावर खराडी जनक बाबा दर्गाजवळील आपले घर सोसायटीसमोर बीआरटी मार्गामध्ये पीएमपीच्या दोन बसची समोरासमोर ध़डक .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.