ganesh murti sakal
पुणे

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पुणेकरांची पसंती

पर्यावरण संवर्धन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करता येतील अशा शाडू तसेच लाल मातीच्या सर्वांगसुंदर गणेशमूर्ती खरेदीस भाविक पसंती देत आहेत

- संतोष खुटवड

पुणे: पर्यावरण संवर्धन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच विसर्जन करता येतील अशा शाडू तसेच लाल मातीच्या सर्वांगसुंदर गणेशमूर्ती खरेदीस भाविक पसंती देत आहेत. नैसर्गिक रंगाच्या विविध चित्ताकर्षक मूर्तींच्या भावात सुमारे २० ते २५ टक्के वाढ होवूनही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास पुणेकर प्राधान्य देत आहेत. यामुळे अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या उत्सवासाठी मूर्ती खरेदीस पुणे शहरासह उपनगरांमधील स्टॉलवर गर्दी होत आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ८ इंच, ते ४ फूटांपर्यंतच्या ६०० रुपये ३५ हजार रुपयांपर्यंतच्या मनमोहक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. सध्या काही विक्रेते पर्यावरण रक्षणासाठी घरीच्या घरीच मूर्ती विसर्जनासाठी लाल मातीच्या मूर्तीसोबत एक कुंडी देण्याची अभिनव संकल्पना राबविली जात आहे. त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागील वर्षीच्या मानाने कमी मागणी आहे. पर्यावरणपूरक शाडू तसेच लाल मातीच्या मूर्तींची सुमारे ६० टक्के नोंदणी झाल्याचे बालाजीनगर, पुणे येथील स्टॉलधारक लक्ष्मण शिंगरूपे यांनी सांगितले. माती, मजुरी तसेच कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने या वर्षी गणेश मूर्तींचे भाव वाढले आहेत.

कोरोनामुळे पिचलेले सामान्य भाविक 'श्रीं'वर असलेल्या असीम श्रद्धेपोटी आवडत्या रूपाच्या खरेदीला पसंती देत आहेत. मूर्तींची खरेदी करताना नागरिक किंमत कमी करण्यासाठी मोठा आग्रह धरत आहेत. त्याच्या श्रद्धेचा मान ठेवून ना नफा ना तोट्या या तत्त्वावर आम्ही विक्री करत आहोत. -धनश्री राऊत, कारखानदार, जय गणेश आर्ट, धनकवडी

घरीच विसर्जन करण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. महागाई वाढली असली तरी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत सध्या मूर्तींची विक्री सुरू आहे. आमच्या कारखान्यातून कॅनडा, मॉरिशीअस तसेच इतर देशांमध्ये मूर्ती पाठविल्या जातात. शहरात यावर्षी सुमारे दीड कोटींची उलाढाल गणेश मूर्तींच्या विक्रीतून होण्याची शक्यता आहे. - भालचंद्र देशमुख, नटराज आर्ट, शुक्रवार पेठ

पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. त्याचा परिणाम गणेश मूर्तीच्या किमतीवर झाला आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच लाडक्या गणरायासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी शाडू मातीच्या तसेच लाल मातीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. - सुनील सोवनी, नागरिक

कागदाच्या गणेश मूर्तींची निर्मिती

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी, मूर्तीचे घरच्या घरी लवकर विघटन होण्यासाठी कागदाच्या लगद्यापासून टिकावू मनमोहक गणेशमूर्तींची निर्मिती आमच्या कारखान्यात केली जाते. घरात कायमस्वरूपी मूर्ती ठेवण्यासाठी कागदापासून बनविलेल्या मूर्ती उपयुक्त ठरतात. या मूर्तींना परदेशातून मागणी असते. विघटन केल्यानंतर तयार झालेले खताचा झाडांच्या वाढीसाठी उपयोग होतो, असे गुजरवाडी येथील शिल्पकार केदार पवार यांनी सांगितले.

या ठिकाणांहून येतात उत्सवासाठी मूर्ती

पेण, नगर, सांगली, कऱ्हाड, दौंड, पुरंदर, खेड, हवेली

दृष्टिक्षेपात

स्टॉलची संख्या... १००० (सुमारे)

कारखान्याची संख्या.... ५००

कामगार ....२५०००

या मूर्तींना पुणेकरांचे प्राधान्य (टक्के)

दगडूशेठ ....८०

बैठ्या रूपातील.....८५

कसबा.........६०

लालबाग......५०

गुरुजी तालीम....५०

तांबडी जोगेश्‍वरी....६३

शारदा गणपती.....६५

असे वाढलेत भाव (रुपयांत)

माती....२०० ते ५०० (प्रती गोणी)

रंग....१५०० ते २००० (प्रती लिटर)

चकमक, खडे ... ४०० (प्रती किलो)

लेस.... ८० ते ९० (प्रती मीटर)

मजुरी..... २०० (प्रती मानसी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT