Eknath shinde 
पुणे

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू

आपण मुख्यमंत्री असल्याने विमानतळ पळविण्याचा विषयच नाही : मुख्यमंत्री एकनात शिंदेंचे सासवडला प्रतिपादन

श्रीकृष्ण नेवसे

सासवड - पुरंदर - हवेलीचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सूचविल्याप्रमाणे पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज विमानतळ देखील विरोध असलेल्या पारगावला वगळून उर्वरीत गावांची शेतकरी संमती घेऊनच होईल. समृ्द्धी महामार्गाच्या धर्तीवर आपण प्रस्ताव घेऊन शेतकऱयांसाठी मान्य होईल असा मोबदला (दर) जाहीर करुन कार्यवाही करु. विमानतळ दुसऱया कोणी (बारामतीकरांनी) आपल्याकडे नेण्याचा विषयच राहणार नाही. कारण आता आपण मुख्यमंत्री आहोत., अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदरमधील मुळ जागेच्या प्रस्तावास सकारात्कम प्रतिसाद दिला.

सासवड (ता. पुरंदर) येथे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शेतकरी जनसंवाद मेळावा आज ता. 2 पालखीतळावर झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी मंत्री तानाजी सावंत, उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, भिमराव तापकीर, शरद सोनवणे, बाळा भेगडे, किरण साळी, गणेश भेगडे, रमेश कोंडे, जालींदर कामठे, गंगाराम जगदाळे, दिलीप यादव, ममता शिवतारे लांडे, ज्योती झेंडे, शालीनी पवार, नलीनी लोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेत बाकी भेटत नव्हते, आपणच भेटत होतो. आमदार, खासदार आणि शिवसैनिक म.वि.आ. सरकारबद्दल तक्रार मांडत होते. राष्ट्रवादीच्या निधी वाटपाने सारे वैतागले होते. शिवसेना पक्ष म्हणून चार नंबरवर गेली. शिवसैनिकांचे खच्चीकरण पाहवत नव्हते. त्यामुळे आमच्यावर उठाव करण्याची वेळ आली. त्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही एेतिहासिक निर्णय घेतला., असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले., मी व देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकाराच्या पाठीशी केंद्रातील मोदी सरकार भक्कम आहे. पैसा कोठेही कमी पडणार नाही, याची हमी घेऊनच सूत्रे हाती घेतली आहेत. ही जनतेने निवडुण दिलेल्या शिवसेना - भाजपच्या नैसर्गिक युतीचे सरकार आहे.

यावेळी प्रास्ताविकात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मतदार संघातील विविध मागण्या मांडल्या. कटकारस्थान करुन मला शेजारच्यांनी पाडले. पण मी किडन्या गमवल्या असल्या तरी पुरंदर - हवेलीचे विकास प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय मरणार नाही., असे भावनिक उद्गार काढले. जालींदर कामठे, आ. शहाजीबापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अतुल म्हस्के यांनी केले. आभार दिलीप यादव यांनी मानले.

धर्मवीर - पार्ट 2, 3 सुद्धा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खास शैलीत म्हणाले., धर्मवीर मु.पो. ठाणे आला. काहींना तो रुचला नाही. आता अजूनही धर्मवीर - पार्ट 2, धर्मवीर - पार्ट 3 येऊ शकतो. अशा घटना भविष्यात समोर येऊ शकतात. हे युती सरकार अडीच वर्षे विलंबाने आले. आता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीतून निसटल्याने.. इथून पुढे शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागणार नाही., हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.

मुख्यमंत्र्यांकडून गुंजवणी प्रकल्प व इतर प्रश्न मार्गी

  • पुरंदर, भोर, वेल्हे तालुक्यांसाठी लाभदायक ठरणाऱया गुंजवणी धरणाचे काम विजय शिवतारे यांनी त्यांच्या कार्यकाळात मार्गी लावले. त्याच्या पाईपलाईनच्या रखडलेल्या कामासाठी आता लगेच 50 कोटी रुपयांची तरदूत मुख्यमंत्र्यांनी सभेत जाहीर केली.

  • पुरंदर - हवेली विधानसभा मतदार संघातील 4 लाख लोकसंख्येसाठीच्या फुरसुंगी, देवाची उरुळी पाणी योजनेच्या शिवतारे यांच्या मागणीवर उर्वरीत कामसाठी 25 कोटी तरतूद जाहीर केली.

  • दिवे (ता. पुरंदर) येथील नियोजित राष्ट्रीय बाजाराचा शिवतारेंचा मुद्दा लक्षात घेऊन त्यातील सर्व अडचणी दूर करुन प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन.

  • पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतील पाण्याचा दर वाढविला, यात शेतकरीहित लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांकडून केले स्पष्ट.

  • हवेली तालुक्यात वाढीव टॅक्सबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT