अंजीर तोडणी करुन योग्य प्रतवारी करतानाचे दृश्य. Sakal
पुणे

पुरंदरचे `अंजीर` ब्रँड सूपर फ़िग्ज़ नावाने जर्मनीला पोहोचले

जीआय मानांकनामुळे युरोपासह जगभरात निर्यात वाढीस शेतकरी सज्ज

श्रीकृष्ण नेवसे

सासवड - पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकवलेले पूना फिग जातीचे `अंजीर` सूपर फ़िग्ज़ ब्रँडच्या नावाने प्रथमच युरोपियन बाजारपेठेत पोहोचले आहे. हॅम्बर्ग (देश जर्मनी) मध्ये गुणवत्तापूर्ण स्थितीत हे अंजीर पोचविण्याचा हा पहीलाच प्रयोग यशस्वी झाल्याने... आता युरोपसह जगाची बाजारपेठ या पुरंदरच्या जीआय मानांकन टॅग केलेल्या अंजिरास खुली झाली आहे.

पूना फिग ही भारतातील सर्वोत्कृष्ट मानली गेलेली अंजीराची जात आहे. तीचे आगार जणु पुरंदर तालुका आहे. याबाबत आज पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.चे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ यांनी सकाळ ला माहिती दिली. पणन संचालक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली हा प्रयोग यशस्वी झाला. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडने हॅम्बर्ग, जर्मनी येथे असलेल्या पिल्झ शिंडलर (Pilz Schindler GmbH) जीएमबीएचला पाठवलेले चाचणी शिपमेंट यशस्वी झाले. कारण ते तेथे परिपूर्ण व गुणवत्तापूर्ण स्थितीत पोहोचले आहे आणि तेथील खरेदीदारांनी त्याची चव घेतली आणि त्याचे कौतुकही केले. गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी उत्पादक कंपनीने इस्त्राईल मधील StePac (पॅकेजिंग सोल्यूशन्समधील तज्ज्ञ), कोल्डमॅन लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस आणि जयजिनेंद्र कोल्ड स्टोअर यांच्या सहकार्याने बायर क्रॉप सायन्सच्या फूड चेन विभागासह पॅक हाऊस चाचण्या घेतल्या. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आम्ही स्टेपॅक आणि बायर यांच्या मदतीने बारामतीतील कोल्डमॅन वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक सुविधा आणि वडकी, पुणे येथील जय जिनेंद्र कोल्ड स्टोअरमध्ये गेल्या २ महिन्यांपासून पॅक हाउस चाचण्या घेतल्या. पॅक हाऊसच्या चाचण्यांमध्ये विशिष्ट प्रोटोकॉल तयार केल्यानंतर आणि त्याचे पालन केल्यावर टिकाऊ क्षमता नसलेला पुरंदर अंजीर 15 दिवसांसाठी परिपूर्ण स्थितीत असल्याचे आढळले.

या यशस्वी पॅक हाऊस चाचणीने आम्हाला आत्मविश्वास दिला की, आम्ही आता जगभरातील कोणत्याही बाजारपेठेत पोहोचू शकतो आणि त्यानुसार आम्ही ही चाचणी खेप जर्मनीला दिली. उरसळ म्हणाले., पिल्झ शिंडलरची भारतीय उपकंपनी असलेल्या scion agricos ने जर्मनीतील हॅम्बर्ग येथे असलेल्या मुख्यालयात या अंजीरांची निर्यात करण्यास मदत केली. ही चाचणी शिपमेंट पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी चालना देणारी ठरेल.

* नवीन बाजारपेठेत या फळांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ विभागाने जीआय टॅग केलेल्या पुरंदर अंजीरच्या चाचणी शिपमेंटला पाठबळ दिले.

* पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावातील मयूर, सौरभ लवांडे यांच्या जीआय टॅग केलेल्या अंजीर बागेमधून अंजीर खरेदी झाली.

* रोहन उरसळ यांचे सहकारी व संचालक रामचंद्र खेड़ेकर (उपाध्यक्ष अंजीर उत्पादक संघ), अतुल कडलग, गणेश कोलते, समिल इंगळे, सागर लवांडे, दीपक जगताप, यांच्यासह इतर संचालकांनी या चाचणी प्रकल्पात आणि निर्यात शिपमेंटमध्ये पुढाकार घेतला.

* स्टेपॅकमधील केतन वाघ यांनी मुख्य कार्यालय इस्रायल येथून पैकिजिंग मटीरीयल मागवले.

* बायर क्रॉप सायन्सचे श्री चेतन भोट यांनी संपूर्ण प्रकल्पात आवश्यक सहाय्य केले युरोपीयन इक्स्पोर्ट प्रोटोकॉल अंबलात अनाईला.

* सुनील पवार, पणन संचालक, यांनी पणन विभागाकडून आर्थिक सहाय्य प्रदान केले, जेणेकरून नवीन फळांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाईल.

* श्री वराडे, निर्यात व्यवस्थापक (पणन विभाग) यांनी चाचणीसाठी सर्व कागदपत्रे तयार करण्यात आणि तयार करण्यात मदत केली.

* धीरज कुमार, कृषी आयुक्त यांनी प्रकल्पाच्या सुविधेसाठी विविध कृषी विभागांकडून सहकार्य केले.

* Sion Agricos चे चिरंजीवी जे पिल्झ शिंडलरसाठी इंडिया मार्केटचे व्यवस्थापन करतात.. त्यांनी हॅम्बर्ग विमानतळावरील क्लिअरन्ससाठी निर्यात नियोजन आणि सुरक्षित मार्गासाठी मदत केली.

* जीआयमुळे पुरंदर अंजीर एक व्यवहार्य निर्यात बाब म्हणून निर्यातदारांचे वेधले जाईल आणि पुरंदरच्या सीताफळासही असाच वाव मिळेल

* पुरंदरला 1,000 एकर क्षेत्रात विविध हंगामात मिळून 4,500 टन अंजीर उत्पादित होतो.

``पहील्या प्रयोगात दहा किलो अंजीर निर्यात झाली. प्रयोगात विविध हंगामात खत, पाणी, किटकनाशक, फवारणी व काढणी, साठवणुक, तापमान पातळी, सुरक्षितता या तंत्रज्ञानात बदल करुन अंजिराची टिकवन क्षमता वाढविण्यात यश आले. भविष्यात स्पेन, टर्की, दक्षिण अमेरीका, अफ्रिकेच्या अंजिरासोबत पुरंदरचा अंजिर स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे.``

- रोहन सतिश उरसळ ः अध्यक्ष, पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT