Drainage water purification project Sakal
पुणे

बांधकामांसाठी वापरले जाणार शुद्ध केलेले मैलापाणी

महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांसाठी मैलाशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बांधकाम साइटवर क्युरिंग किंवा काँक्रेटिकरणासाठी महापालिकेच्या टॅंकर भरणा केंद्रावरून थेट पिण्याचे पाणी नेले जात असल्याने चांगल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांसाठी मैलाशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांना केवळ पाणी वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे.

शहराच्या सर्वच भागात मोठ्याप्रमाणात बांधकाम सुरू आहेत. बांधकामासाठी पाणी कमी पडू नये यासाठी तेथे कुपनलिकेद्वारे किंवा टँकरद्वारे पाणी उपलब्ध केलेले असते. पिण्यासाठी योग्य असलेले पाणी बांधकामासाठी विशेषतः क्युरिंगसाठी वापरले जात असल्याने त्याची नासाडी होत आहे. पुणे महापालिकेला पाणी वापर कमी करायचा असल्याने त्यादृष्टीने उपाय योजना सुरू आहेत. त्यादृष्टीने पाणी पुरवठा व बांधकाम विभागाने शुद्ध केलेले मैलापाणी बांधकामासाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार केला गेला. त्यास नुकतीच आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

शहरात महापालिकेचे १० मैलाशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यात रोज ५६७ एमएलडी पाणी शुद्ध करून ते नदीत सोडून दिले जात आहे. तर दररोज टँकर भरणा केंद्रावरून रोज शेकडो टँकर बांधकाम साइटवर जात आहेत. शुद्ध केलेले मैलापाणी व पिण्याचे पाणी दोन्हीची अपव्यय थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने बांधकाम संघटनांशी चर्चा केली. मैला शुद्धीकरण केंद्रावरील शुद्ध पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्यामध्ये हे पाणी बांधकामासाठी योग्य असल्याचे समोर आले आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले,‘‘ बांधकाम करताना सिमेंट काँक्रिटचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी पाण्याचा भरपूर वापर केला जातो. विशेषतः ‘क्युरिंग’च्या कामात पाणी जास्त लागते. यासाठी टँकरने किंवा कुपनलिकेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केले जाते. यात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांशी चर्चा केली. शहराच्या सर्वच भागात मैलापाणी शुद्धीकरण केंद्र असल्याने तेथून टँकरद्वारे पाणी घेऊन जाणे शक्य असल्याने पाणी वापरासाठी बांधकाम व्यावसायिकांनी तयारी दाखवली आहे.

महापालिकेच्या बांधकामासाठीही वापर

महापालिकेच्या भवन विभागातर्फे इमारतींचे बांधकाम केले जाते. तर शहरात पथ विभागातर्फे सिमेंट काँक्रिटचे रस्ते करताना मोठ्याप्रमाणात पाणी वापरले जाते. उद्यान विभागही पाण्याचा वापर जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी शुद्ध केलेले मैलापाणी वापरले जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या मैला शुद्धिकरण केंद्रांची क्षमता (एमएलडीमध्ये)

बाणेर - ३०

मुंढवा - ४५

खराडी - ४०

भैरोबानाला - १३०

एरंडवणे - ५०

नरवीर तानाजीवाडी - १७

बोपोडी - १८

नायडू हॉस्पिटल(जुना) - ९०

नायडू हॉस्पिटल (नवा) - ११५

विठ्ठलवाडी - ३२

एकूण - ५६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT