राहू (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुणे स्टेशनवरून वाघोली मार्गे राहू पीएमपी एल बसची सेवा शनिवारपासून सुरू करण्यात आली. नवीन सजवलेली बस ही राहू येथील महात्मा फुले चौकात आल्यानंतर ढोलकी, ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली बस आकर्षण दिसत होती. बससेवेचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते शांताराम बांदल, माऊली दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सीए अतुल भोसले, सचिन शिंदे, पुरुषोत्तम हंबीर, काकासाहेब तापकीर, बाळासाहेब डुबे, मदन नवले, राहुल वरपे, बापूसाहेब देशमुख, मच्छिंद्र शिंदे, आश्रू डुबे, गणपत डुबे, अरुण डुबे, बाळासाहेब कारंडे, दादा टेळे, विकास झिटे, यांच्यासह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान चालक बाळासाहेब सातपुते, वाहक राजेंद्र मिसाळ यांना शाल, श्रीफळ, फेटे बांधून स्वागत करण्यात आले.
राहूच्या मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर राहू ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पीएमपीएल बसचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बंडू नवले, पंचायत समितीचे माजी सदस्य किसन शिंदे, सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य माऊली शिंदे, अक्षय चव्हाण, बापू कदम, संतोष पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघोली राहू मार्गावर पीएमपीएल बस कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी नागरिकांनी बसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा. या मार्गावर 'हात दाखवा आणि बस थांबा' अशा प्रकारची सूचना सर्व चालकांना देण्यात आलेले आहे, अशी माहिती पीएमपीएलच्या अधिकार्यांनी यावेळी दिली. राहू येथील ग्रामदैवत शंभू महादेवाच्या प्रांगणात बससमोर नारळ फोडून गावांमध्ये प्रदर्शना घालण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.