Rahul Gandhi esakal
पुणे

Pune News : राहुल गांधी यांच्यावर दाखल तक्रारीची सुनावणी होणार ‘एमपी एमएलए’ न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी आता एमपी एमएलए या विशेष न्यायालयात होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होर्इल.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यातील प्रकरणांची सुनावणी जलदगतीने व्हावी यासाठी उच्च न्यायालयाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा व सत्र न्यायालयात ‘एमपी एमएलए’ हे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. गांधी यांच्या तक्रारीची सुनावणी या न्यायालयात घेण्याबाबतचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिला आहे. गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते.

त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिलेला आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

काय असते ‘एमपी एमएलए’ न्यायालय -

कोणत्याही जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्याविरोधात फौजदारी संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि रिट पिटीशन (क) क्र ६९९, २०१६ या अंतर्गत दाखल सर्व दावे विशेष न्यायालयात चालविले जातील, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाने काढली होती. त्यानुसार या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष न्यायालयात सर्व आजी व माजी खासदार आणि आमदारांचे फौजदारी दावे चालविले जातात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या बदनामी विरोधात दाखल फौजदारी दाव्याची पुढील सुनावणी या विशेष न्यायालयात होणार आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी हे विशेष न्यायालय राहुल गांधी यांना समन्स पाठवेल व नेमलेल्या तारखेस राहुल गांधी यांना विशेष न्यायालयासमोर उपस्थित राहावे लागेल.

- ॲड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा बीपी लो! बीडमध्ये तणाव, एसटी बंद; वडीगोद्रीमध्ये मराठे रस्त्यावर

KL Rahul प्रेमापोटी टीम इंडियाने दोन खेळाडूंना लटकवलं; ना रिलीज केलं ना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली

Ulhasnagar News : आयुक्त धावले सेवनिवृत्तांच्या मदतीला! 25-30 वर्षात मिळणारी कोट्यवधींची थकबाकी आता 10 महिन्यातच मिळणार

Otur News : पिंपळगाव जोगा धरणातील बेपत्ता मच्छिमाराचा अठ्ठेचाळीस तासाने मिळाला मृतदेह

Latest Maharashtra News Updates Live: अमित शहा नागपूरात आले त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती - काँग्रेस

SCROLL FOR NEXT