Rahul Gandhi|VD Savarkar Esakal
पुणे

Rahul Gandhi: सावरकरांची बदनामी प्रकरण; पुणे पोलिसांनी कोर्टाला असं काय सांगितले? ज्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

Veer Savarkar: एका तक्रारीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींवर 2023 मध्ये लंडनमधील भाषणात हिंदुत्वाच्या विचाराची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

आशुतोष मसगौंडे

राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप खरा असल्याचे पुणे पोलिसांनी नुकतेच न्यायालयात सांगितले. एका तक्रारीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींवर 2023 मध्ये लंडनमधील भाषणात हिंदुत्वाच्या विचाराची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान पुणे पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार खरी असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला.

यानंतर आता राहुल गांधी यांना न्यायालय नोटीस बजावू शकते, त्याचबरोबर त्यांना न्यायालयात हजरही व्हावे लागू शकते.

कोणी दाखल केला खटला?

सात्यकी सावरकर यांनी एप्रिल 2023 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता आणि शहर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना सात्यकी यांनी सादर केलेल्या पुराव्याची पडताळणी करून २७ मेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

काय म्हणाले होते राहुल?

खरेतर, तक्रारीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात दावा केला होता की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकर त्यामुळे खुश होते.

राहुल गांधी यांच्या या आरोपावर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर म्हणाले होते की, अशी कोणतीही घटना घडली नव्हती आणि सावरकरांनी असे कुठेही लिहिले नव्हते. राहुल गांधी यांचे हे विधान काल्पनिक, खोटे आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे.

पोलीस अहवालात काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार विश्रामबाग पोलिसांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून तपासात व्ही.डी. सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याही पुस्तकात अशा घटनेबद्दल लिहिलेले नाही, असे सांगितले आहे. त्यानंतरही राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान अशी टीका करून सावरकरांची बदनामी केली. सात्यकी सावरकर यांनी दिलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT