railway bogie fire sakal
पुणे

Railway Bogie Fire : पुणे स्थानकातील रेल्वेच्या डब्याला भीषण आग

पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. या आगीत इतर दोन डब्यांना आगीची झळ बसली. त्यामध्ये प्रवासी नसल्यामुळे कोणी जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. आगीचे कारण समजू शकले नाही.

रेल्वे स्थानकात फलाटावर थांबलेल्या रेल्वेच्या एका डब्याला सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. याबाबत अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळताच नायडू, येरवडा आणि बी. टी. कवडे रस्ता अग्निशामक केंद्रांकडून चार बंब आणि मुख्यालयातून पाण्याचा टँकर तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आला.

क्वीन्स गार्डनच्या पाठीमागे फलाटावर बऱ्याच दिवसांपासून उभ्या असलेल्या रेल्वेच्या तीन डब्यापैंकी एका डब्याला आग लागली होती. तेथील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. डब्यात कोणी प्रवासी, रेल्वे कर्मचारी नसल्याची खात्री करून जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला.

रेल्वे पोलिसांच्या मदतीने सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एका डब्याचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विजय भिलारे यांच्यासह २० जवानांनी आग आटोक्यात आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

Vikhe-Thorat Controversy: विखे-थोरात वाद टोकाला! "नीच लोकांना...."; सत्यजीत तांबे आक्रमक!

Ambabai Temple : अंबाबाई चरणी तब्बल एक कोटी 14 लाखांचं दान; मंदिर आवारातील 12 देणगीपेट्यांतील मोजणी पूर्ण

Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!

Sakal Podcast: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती ते तालिबानमध्ये टीव्हीवर दिसणार नाहीत जिवंत प्राणी

SCROLL FOR NEXT