rain forecast Delayed arrival of Monsoon Expected to arrive in Kerala on 4th June sakal
पुणे

Weather Update : मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता; ४ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

नियोजित वेळेच्या किमान तीन दिवस उशिरा मॉन्सूनचे आगमन होण्याची चिन्हे

अक्षता पवार

पुणे : यंदा नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यांच्या आगमनाची वेळ काहीशी लांबण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन आगमनाची स्थिती पाहता साधारणपणे मॉन्सून हा १ जून पर्यंत केरळमध्ये दाखल होतो. मात्र यंदा ४ जून पर्यंत मॉन्सून केरळ मध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

त्यामुळे नियोजित वेळेच्या किमान तीन दिवस उशिरा मॉन्सूनचे आगमन होण्याची चिन्हे आहेत. हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (ता. १६) मॉन्सूनच्या केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार मॉन्सूनचे आगमन चार दिवस पुढे मागे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आले आहे.

मॉन्सूनचा अंदाज जाहीर करताना सहा प्रमुख घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, वायव्य भारतातील किमान तापमान, ईशान्य हिंद महासागरावर वाहणारे वारे, प्रशांत महासागरात वायव्येकडे समुद्राच्या सापाटीला असलेले हवेचा दाब, दक्षिण चीन समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग आणि आग्नेय हिंद महासागरात खालील स्तरावर वाहणारे या घटकांचा समावेश असतो.

गेल्या वर्षी मात्र मॉन्सून तीन दिवस आधी (२९ मे) केरळमध्ये दाखल झाले होते. तर यंदा तीन दिवसांचा विलंभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज त्याचबरोबर देशभारत होणाऱ्या पावसाचे वितरण याबाबतची स्थिती हवामनशस्त्र विभागाद्वारे जाहीर केली जाईल.

मॉन्सूनचे केरळमध्ये दाखल होण्याच्या तारखा

वर्ष : दाखल होण्याचा अंदाज : प्रत्यक्षात दाखल झाले

२०१८ : २९ मे : २९ मे

२०१९ : ६ जून : ८ जून

२०२० : ५ जून : १ जून

२०२१ : ३१ मे : ३ जून

२०२२ : २७ मे : २९ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT