Pune Rain Record Esakal
पुणे

Pune Rain Record: पुण्यातील पावसाने मोडला 8 दशकांचा विक्रम! 1938 नंतर सप्टेंबरमध्ये पडला सर्वाधिक पाऊस

आशुतोष मसगौंडे

गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह पुण्यात पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता पुण्यात 1938 नंतर म्हणजेच 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील IMD स्टेशनवर 131 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतांश पाऊस दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत झाला आहे. असे वृत्त आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

बुधवार सकाळी 8.30 ते गुरुवारी सकाळी 8.30 पर्यंतची 24 तासांची अंतिम आकडे गुरुवारी सकाळी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे 1938 मधील 132.3 मिमी पुण्यातील सप्टेंबरमधील सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई व पुण्यासह अनेक शहरांना वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी_चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातही मूसळधार

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवार आणि गुरुवारी दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सासऱ्यांनी प्रेमविवाह केला, गावकऱ्यांचा संताप, पंचायतीने सुनेला धक्कादायक शिक्षा सुनावली, महाराष्ट्रातील घटना

Nashik Crime News : शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारांना लुटणारे दोघे गजाआड! चोरीचे मोबाईल अन 12 दुचाकी हस्तगत

Ulhasnagar Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांकडून पर्दाफाश

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah : "मला शो सोडायचाय म्ह्णून निर्माते त्रास देतायत" ; तारक मेहता...मधील सोनुने केला आरोप

Latest Maharashtra News Updates: २८ सप्टेंबरला भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT