rain reduced water in Panshet Dam is being released for power generation sakal
पुणे

Panshet Dam : पावसाचा जोर कमी झाल्याने पानशेतमधील वीज निर्मिती पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : पावसाचा जोर कमी झाल्याने पानशेत धरणातील पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात आले आहे. या धरणातील विसर्ग ३१ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता बंद करण्यात आला होता. पानशेतमधील वीज निर्मितीसाठी रविवारी रात्री अकरा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी धरणातून ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे.

पानशेत, वरसगाव परिसरात आज पाऊस पडलेला नसला तरी सध्या कोकण घाट माथ्यावरील दऱ्या खोऱ्यातून पाणी धरणात जमा होत‌ आहे. जादा पाणी ‌वीज निर्मितीसाठी सोडले जात आहे. तसेच,‌ वरसगाव धरणातून शनिवारपासून वीजनिर्मितीसाठी धरणातून ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग १२०० क्यूसेक पाणी हा थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

दरम्यान, खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर या चारी धरणामध्ये आज रविवारी दिवसभरात पाऊस पडलेला नाही. शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत आणि वरसगाव धरण १०० टक्के भरले आहे. खडकवासला धरणात १.०० टीएमसी म्हणजे ५०.६३ टक्के पाणीसाठा आहे. तर टेमघर धरणात २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात २७.४३ टीएमसी म्हणजे ९४.१२ टक्के धरण भरलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bopdev Ghat: आणखी किती पळणार... बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना अखेर पोलिसांनी शोधलं

सूरजला सिनेमात घेतलं म्हणून ट्रोल करणाऱ्या कलाकारांना केदार शिंदेंनी सुनावलं, म्हणाले- तुम्ही कधीही...

दलित कुटुंबासोबत राहुल गांधींनी घेतला जेवणाचा आस्वाद; 'त्या' जेवणाचे घेतले नमुने, महत्त्वाची माहिती आली समोर

Dussehra 2024: यंदा 12 की 13 ऑक्टोबर कधी साजरा केला जाणार दसरा? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् वेळ

Gunratna Sadavarte: सदावर्तेंच्या गाढवामुळे सलमान आला अडचणीत! बिग बॉसला आली कायदेशीर नोटीस, काय हा प्रकार ?

SCROLL FOR NEXT