Pune Unseasonal Rain sakal
पुणे

Pune Unseasonal Rain: अवकाळी पावसाने पुणेकरांना झोडपले

गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरींची नोंद ही झाली. त्यामुळे उकाडाही प्रचंड जाणवू लागला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- विजांचा कडकडाट...मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्‍याचा वारा...अन् त्यात धो-धो पडणारा पाऊस... तर काही ठिकाणी गारा... रविवारची सुटीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. शहरात झालेल्या अवकाळी पावसाने पुणेकरांना चांगलेच झोडपले. मात्र सोमवारपासून (ता. १०) ही स्थिती काहीशी निवळेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरींची नोंद ही झाली. रविवारी (ता. ९) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडाही प्रचंड जाणवू लागला होता. दुपारनंतर मात्र जिल्ह्यावर ढगांची दाटी झाल्याचे उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रातून दिसून आले.

बघता-बघता पेठांसह उपनगरात धुव्वाधार पावसाला सुरवात झाली. त्यात कात्रज, खडकवासला, सिंहगड रस्त्यासह काही ठिकाणी गारा पडल्‍या. अवकाळी पावसाच्या या मुसळधार पावसाच्या सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना देखील कसरत करावी लागली. तर खरेदीसाठी तसेच चतुर्थीनिमित्त दर्शनाला आलेले नागरिक पावसात चांगलेच अडकले.

शहरात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला होता. त्यात अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली. असे असले तरी उद्यापासून (ता. १०) पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे.

अन् बत्ती गुल...

विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह शहरासह उपनगरांना वादळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे अनेक भागात बत्ती गुल झाली होती. जोरदार पाऊस व चमकणाऱ्या विजा यातच विमाननगर, घोरपडी, वाघोली, कोथरूड, वडगाव धायरी व इतर भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्यात बाहेर ही बरसणाऱ्या धुव्वाधार सरींमुळे दृश्यमानता ही कमी झाली होती. वाहतूक कोंडीवर ही याचा परिणाम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

SCROLL FOR NEXT