Pune Rain News sakal
पुणे

Pune Rain News : पुण्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र येत्या गुरुवारपासून (ता. १) पुढील दोन दिवस पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होईल. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारपासून तीन दिवस पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे.

शहरात गेल्या गुरुवारी (ता. २५) चोवीस तासांत ११४.१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर कमी कमी झाला. या चार दिवसांमध्ये ७६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात (१ जून ते ३० जुलै) शिवाजीनगर वेधशाळेत ६१६.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या दरम्यान सरासरी ३२९.९ मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र सरासरीच्या तुलनेत यंदा २८६.८ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात येत्या बुधवारी (ता. ३१) पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर पावसाचा जोर जिल्ह्यात वाढेल. गुरुवारपासून पुढील दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाच्या मुसळधार सरी पडणार असून, शहर परिसरातही पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली.

जुलैमधील पाऊस

पुणे जिल्ह्यात १ ते ३० जुलै सरासरीदरम्यान ३००.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा या दरम्यान ५९४.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा या महिन्यात ९८ टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

हवामान अंदाज

बुधवार (ता. ३१) : आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडतील. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडेल.गुरुवार (ता. १) : आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून, घाटमाथ्यावर काही भागात खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT