Raj Thackeray In Pune 
पुणे

Raj Thackeray In Pune: आयुष्यात मला कधी 'काका' म्हणू नको; राज ठाकरे असं का म्हणाले?

कार्तिक पुजारी

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज पुण्यात आहेत. शुक्रवारी ते पुण्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. त्याआधी त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी केलेल्या 'काका'च्या उल्लेखामुळे सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायलं मिळालं.

कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ वसंत मोरे यांच्याकडे आहे. आणि येथेच त्यांना अजित पवार सापडला आहे. मला कळेना हल्ली हे कोणत्याही पक्षात जातात काय? हा बरोबरचा सहकारी आहे. पण, मला तू आयुष्यात चुकूनही काका म्हणू नको, असं ते म्हणाले. अजित पवार नावाच्या कार्यकर्त्याला उद्देशून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

राज्यात जे काही राजकारण सुरु आहे. त्यामुळे या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील असं मी एकाला विचारलं तर तो म्हणाला २०२५ मध्ये. राज्यात काय सुरुय कळत नाही. लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा. राज्याचा जो विचका झाला आहे यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याची आपण शपथ घेऊ, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ज्या प्रकारे लोकांमध्ये ध्रुविकरण सुरु आहे. त्यातून या लोकांना जागा दाखवून देऊया. त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना जबाबदारी देण्यात आली आहे, ते त्या पद्धतीने काम करत राहतील अशी मला आशा आहे. बाकी मी कामाचा आढावा घेत राहीनच, असं ते म्हणाले. यावेळी राज यांनी वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुक केले. वसंत मोरे अत्यंत चांगलं काम करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत शिस्तबद्ध आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. काका आणि पुतण्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Health: उपोषणस्थळी भोवळ अन् रक्तदाबाचा त्रास, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

देवेंद्र फडणविसांची मोठी खेळी! शरद पवार गटाचा वरिष्ठ पदाधिकारी भाजपच्या ताफ्यात, रोहितदादांना धक्का

Daughters Day निमित्त अश्विन लेकींना देणार स्पेशल बॉल, पण मुलींनीच दिला नकार; पाहा Video

Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात

विराट कोहली - ऋषभ पंतचा मैदानात दिसला याराना, गॉगल केले अदला-बदली; Video Viral

SCROLL FOR NEXT