Raj Thackeray Team eSaka
पुणे

शिवजयंती तिथीनुसार धुमधडाक्यात साजरी करा; राज ठाकरेंचं आवाहन

राज ठाकरेंनी आजच्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली आहे.

सुधीर काकडे

पुणे : मनसेचा आज १६वा वर्धापनदिन आहे. दरवेळी मुंबईत होणारा हा वर्धापनदिन यावेळी पुण्यात (Pune) पार पडतो आहे. आगामी काळातील महानगर पालिका निवडणुकांत्या दृष्टीने मनसे तयारीला लागल्याचं दिसतंय. कोरोना काळानंतर होणारी ही पहिलीच एवढी मोठी सभा होत असल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Raj Thackeray Speech Live MNS 16th Anniversary in Pune)

शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराजांची जयंती ३६५ दिवस करा? जयंती तिथीने का करतोय? कारण आपण आपले सर्व सण तिथीनुसार साजरा करतो. दिवाळी, गणपती, नवरात्र सर्व सण तिथीनुसार करतो. छत्रपतींची जयंती करतो, तर तो एक सण आहे. माझ्या राजांचा जन्मदिवस माझा सण आहे, हा मराठी माणसाचा सण आहे. हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

मी आज जे बोलणार आहे तो फक्त एक टीझर आहे, या सर्व गोष्टींचा पिक्चर शिवतीर्थावर दिसेल असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंकडून संजय राऊत यांची नक्कल

संजय राऊत यांच्यावर बोलताना राज ठाकरेंनी त्यांचीही नक्कल केली. राज ठाकरे म्हणाले, ते नेहमी अॅक्शन करत असतात. कॅमेरा हाटला की नॉर्मल होतात. ही अॅक्शन कुठून येते असा सवाल राज ठाकरेंनी केला.

राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर राज यांची टीका

राज्यात काय सुरु आहे समजत नाहीये. विरोधक म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, मग उरलं कोण? आपण असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.

मागच्या काळात निर्माण झालेल्या स्थित्यंतरामुळे काय करावं ते लोकांना कळत नाहीये, हाताला काही लागत नाहीये. ही मागची दोन वर्ष आपल्याला विसरता येणार नाही. मला तर अजिबात विसरता येणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर बोलायचं नाही, पण...

निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. मुख्यमंत्री आजारी आहेत, मला त्यांच्या आजारपणावर बोलायचं नाही, मात्र खरं कारण तेच आहे असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. अनेकांना निवडणुका लढवयच्याच नाहीत.

राज्यपालांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले,...

राज्यपालांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला माहिती आहे का? असा सवाल राज्यपालांना उद्देशून राज ठाकरेंनी केला. बघितलं ना त्यांना कसं आहेत ते...पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा वाटलं मला हात बघून भविष्य बघायला लागतील. बडबडे ज्योतिषी असतात तसे. तुम्हाला काय कळतं का, शिवाजी महाराज, महात्मा फुले माहिती आहेत का? आपला काही संबंध नसताना नुसतं बोलायचं. ना छत्रपतींनी सांगितलं ना रामदास स्वामींनी सांगितलं की ते गुरुशिष्य होते. नुसतं भांडणं लावायची, एकाची विदवत्ता कमी करायची एकाचं शौर्य कमी करायचं. रामदास स्वामींनी छत्रपतींबद्दल लिहलंय ते मी माझ्या घरात लावलंय. रामदास स्वामींनी छत्रपतींबद्दल जे लिहिलंय तेवढं चांगलं आजतागायत मी वाचलं नाही. वाचा "निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।"

लता मंगेशकर यांनी मोठे कष्ट केले. त्यांचा इतिहास न जाणून घेता आपण फक्त जात पाहिली. राज्यातले पक्ष आपल्याला जातीपातीमध्ये विभागायला बसलेत. - राज ठाकरे

कोरोना काळात जगावर संकटं आलीत. मात्र माझ्यावर, माझ्यावर संकट सुरु आहेत. संकटं येताना एकटी येत नाहीत, मात्र जाताना ती एकटीच जातात. या संकटांतून आपल्याला शिकायचं असतं.

दोन वर्षांपूर्वी आझाद मैदानावर शेवटचं भाषण केलं होतं. त्यानंतर तुम्हीही बोलले नव्हता आणि मी पण बोललो नव्हतो. त्यामुळे आज अनेक दिवसांनी आलो तर प्रॅक्टीस आहे की नाही हे चेक करावं म्हटलं. तुम्हाला सर्वांना मनसेच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा - राज ठाकरे

बाळा नांदगावकर यांनी आता वातावरण बदलत असल्याचं सांगितलं. तसंच हम होंगे कामयाब असं म्हणत आता आम्हीही कामयाब होऊ असं सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT