भोर : नंतनगर-निगडे (ता.भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीकरीता दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी बुधवारी (ता.१८) १९ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. यामुळे १७ जागांपैकी १० जागा बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान मंगळवारी (ता.१७) साखर आयुक्तांकडून अपिलावर देण्यात आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीच्या ११ पैकी ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते.
त्यानंतर बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कारखान्यातील सत्ताधारी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबते सुरु होती. कॉग्रेसचे आमदार संग्राम थोपटे व तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे तर राष्ट्रवादीकडून भालचंद्र जगताप, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, भोरचे माजी नगरसेवक यशवंत डाळा यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. मात्र भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निवडणूक बिनविरोध करण्यास तयार नसल्याचे दिसून आले.
अर्ज माघारी घेतलेले उमेदवार व मतदारसंघ पुढीलप्रमाणे : व्यक्ती उत्पादक मतदारसंघ -
गट क्रमांक 1 भोर-देवपाल - किसन शिनगारे, विठ्ठल कुडले व शिवाजी बांदल.
गट क्रमांक 2 येवली-हातवे ब्रु,.- संग्राम थोपटे, दत्तात्रेय भिलारे व संजय भिलारे.
गट क्रमांक 3 सारोळा-गुणंद-खंडाळा - शैलेश सोनवणे व ज्ञानेश्वर बागल.
गट क्रमांक 4 कापूरव्होळ-वेळू-हवेली - दिलीप कोंडे.
गट क्रमांक 5 रुळे-वरसगाव-पानशेत -संभाजी मांगडे, संदीप नगीने, दिलीप रेणुसे.
मतदारसंघ ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था - संग्राम थोपटे व मनोज निगडे.
मतदारसंघ अनुसूचीत जाती-जमाती - राजाराम कांबळे.
मतदारसंघ महिला राखीव - अलका मालुसरे.
मतदारसंघ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - किसन शिनगारे, सोमनाथ वचकल व राजेश राऊत.
बिनविरोध निवडून येणारे संभाव्य उमेदवारांमध्ये किसनराव सोनवणे, दत्तात्रेय चव्हाण, विकास कोंडे, शिवाजी कोंडे, संग्राम थोपटे, अशोक शेलार, सुरेखा निगडे, शोभा जाधव, संदीप नगीने व चंद्रकांत सागळे आदींचा समावेश आहे. गुरुवारी (ता.१९) निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांची अंतीम यादी व बिविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.