Rajgad Fort Sakal
पुणे

किल्ले राजगडच्या पायथ्याशी होणार महाराणी सईबाई समाधीस्थळ

शिवपट्टण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आमदार संग्राम थोपटे व विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची शनिवार रोजी पाहणी केली.

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे,(पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) धर्मपत्नी व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई (Queen saibai) यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून या समाधी स्थळ व शिवपट्टण परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आमदार संग्राम थोपटे व विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या परिसराची शनिवार (ता.०८) रोजी पाहणी केली .याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सूचना केल्या होत्या. (Pune Marathi News)

महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाल बुद्रुक या गावामध्ये समाधी स्थळ असून किल्याच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यास व परिसरास शिवपट्टण म्हणत .गेली अनेक वर्षांपासून या समाधीस्थळ परिसराची दुरवस्था झाली होती तर या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग राहिला नव्हता तर येथील शिवकालीन जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाली असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी निर्माण होत होती परंतु या विकास परिसर आराखड्यामुळे येथील शिवकालीन इतिहासाला उजाळा मिळणार असून लाखो पर्यटक याठिकाणी भेट देतील.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संग्राम थोपटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी राजगडाच्या पायथ्याशी महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाच्या अनुषंगाने श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज स्मारक समिती ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विकास आराखड्यासाठी निधी दिला जाणार असून हा विकास दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा फार मोठा इतिहास लाभला असून हे गडकिल्ले दुर्लक्षित होऊ नयेत त्यासाठी त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. या समाधीस्थळ व परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह जलसंपदा, भूमी अभिलेख, पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन पाहणी करुन अहवाल सादर करण्याचेही निर्देश सभापतींनी यावेळी दिले होते .

त्यानुसार आज शनिवारी (ता.८ ) रोजी डॉ. राजेश देशमुख यांनी राणी सईबाई समाधीस्थळ,शिवपट्टण,खंडोबाचा माळ या परिसराची पाहणी केली यावेळी आमदार संग्राम थोपटे,वेल्हेचे सभापती दिनकर सरपाले,पुरातत्व विभागाचे विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, भोरचे महसूल उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे ,अभियंता अजय भोसले, कार्यकरी अभियंता नीरा देवघर राजेंद्र

डुबल, वनविभागाच्या अधिकारी आशा भोंग,तहसीलदार शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे,कुरण बुद्रुक गटाचे अमोल नलावडे, वेल्हेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,नाना धुमाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप मरळ, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे,पालचे सरपंच गोरख शिर्के, मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे,वांगणीचे उपसरपंच शिवाजी चोरगे,भगवान शिंदे, आदींसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

दरम्यान महाराणी सईबाई समाधी यांच्या समाधीस्थळाचे दुरावस्था पाहिल्यानंतर दोन वर्षांपूर्वी शिवशंभु प्रतिष्ठान कात्रज चे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्याकडून या ठिकाणी तात्पुरते निवारा शेड उभारण्यात आले होते तर या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा अशी मागणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT