पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोपासून विविध विकासकामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी महानगरपालिकेने शहर चकाचक केलंय. पण पंतप्रधान येण्याआधीच त्यांचा दौरा काँट्रोव्हर्सीत आलाय. मोदींना भाजपकडून फेटा देण्यात येणार आहे. त्यावर छत्रपतींची राजमुद्रा असल्याने महाराजांचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. संसदेत शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात विरोध आहे. काँग्रेसने त्यासाठी हातात काळे झेंडे दाखवत आंदोलन केलंय.
मोदींचा फेटा चर्चेत आल्यानंतर त्यावरील राजमुद्राही चर्चेत आलीय. अखेर ही राजमुद्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्याने जाहीर केलेल्या फोटोमध्ये ही राजमुद्रा काढल्याचं दिसतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुणे प्रशासनाकडून चालली आहे. दरम्यान, मोदींच्या स्वागतासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी शाही फेटा तयार करून घेतला आहे. ऑस्ट्रेलियन डायमंडचा वापर केलेल्या या फेट्याची आणखीही काही खास वैशिष्ट्ये आहेत. पण फेटा घालण्याआधीच चर्चेचा विषय ठरलाय.
सुर्यफुलात राजमुद्रा
मोदींनी देण्यात येणाऱ्या या शाही फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलात शिवमुद्रा बसविण्यात आली होती. सूर्यफुल नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते, याच थीमवर फेटा तयार करण्यात आल्याची माहिती मुरुडकर यांनी दिली. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यापार्श्वभूमीवर फेटा तयार करताना तो वजनाला हलका आणि डोक्याला जास्त गरम होणार नाही अशा पद्धतीने तयार करण्यता आला आहे. फेट्यासाठी रेशमी आणि कॉटनचे कापड वापरण्यात आलंय. तसंच फेट्यामधून हवा आत-बाहेर जावी, मोदींना त्रास होवू नये, यासाठी मध्यभागात जाळीही तयार केल्याचं त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.