पुणे - रुपी को-ऑप. बॅंकेचे (Rupee Cooperative Bank) महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत (Maharashtra State Cooperative Bank) विलीनीकरण (Merge) करण्यास रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank) नकार (Oppose) दर्शविला आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंकेने पत्र जारी केल्याची माहिती सहकार उपनिबंधक आनंद कटके यांनी गुरुवारी (ता. ५) दिली. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे ठेवीदारांचे भविष्य अद्याप टांगणीला लागले आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे रुपी बॅंकेवर आर्क्षिक निर्बंध असून, ऑगस्टअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. रुपी बॅंकेचा कारभार सध्या प्रशासकीय मंडळाकडून चालविण्यात येत आहे. रुपी बॅंकेमध्ये सुमारे पाच लाख ठेवीदारांच्या एक हजार तीनशे कोटींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात, तसेच बॅंकेचे पुनरुज्जीवन व्हावे, या उद्देशाने राज्य बॅंकेने १६ जानेवारी २०२० रोजी विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे दिला होता.
खासदार गिरीश बापट यांनी रुपी बॅंकेचे बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी नुकतीच केली आहे. तर, दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेने लघु वित्तीय बॅंकेला परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे रुपी बॅंक अवसायनात निघणार, तिचे इतर बॅंकेत विलीनीकरण होणार की खासगीकरण याबाबत ठेवीदारांच्या मनात संदिग्धता आहे.
‘हा सहकार क्षेत्रावरील अन्याय’ : अनास्कर
लोकमान्य टिळकांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेली सहकार क्षेत्रातील बॅंक वाचविण्याचे प्रयत्न राज्य बॅंकेकडून करण्यात आले. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा केल्यानंतरच विलिनीकरणाबाबत संयुक्त प्रस्ताव दिला होता. परंतु रिझर्व्ह बॅंकेने राज्य बॅंकेला एकदाही चर्चेला बोलावले नाही. राज्य बॅंकेच्या प्रस्तावामध्ये कोणतीही चूक काढलेली नाही. तसेच, प्रस्ताव नाकारताना कोणतेही कारण दिलेले नाही. त्यामुळे हा सहकार क्षेत्रावरील अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली.
रुपी बॅंकेचे राज्य बॅंकेत विलीनीकरण करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून झालेला विलंब लक्षात घेता हा निर्णय अनपेक्षित नव्हता. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचा हा धोरणात्मक निर्णय आहे. विलीनीकरणाच्या प्रस्तावात दोष किंवा वैगुण्य नाही. रूपीचे अन्य सक्षम बँकेत विलीनीकरण, लघुवित्त बँकेत रुपांतर किंवा पुनुरुज्जीवन यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. समाधानाची बाब म्हणजे रुपीचे ठेवीदारही सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहेत.
- सीए सुधीर पंडित, प्रशासक, रुपी बँक
रुपी बॅंकेची मार्चअखेर स्थिती
ठेवी : १२९६ कोटी ७३ लाख रुपये
कर्जे : २९४ कोटी १५ लाख रुपये
हार्डशिप योजनेंतर्गत ठेवीदारांना दिलेली रक्कम : ३७१ कोटी रुपये
गेल्या आठ वर्षांत कर्जवसुली : ३०० कोटी रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.