rbi use of 2000 notes for purchase of jewellery pune finance investment  esakal
पुणे

RBI withdraws Rs 2,000 Note : दागिण्यांच्या खरेदीत वाढ, व्यवहारासाठी दोन हजारांच्या नोटांचा वापर

दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून सोन्या- चांदीची खरेदी होत आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सराफ बाजारातील उलाढाली काहीशा वाढल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून सोन्या- चांदीची खरेदी होत आहे. गुंतवणूक करून भविष्यात फायदा व्हावा आणि आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा संपाव्यात या उद्देशाने ही खरेदी होत आहे.

दोन हजार रुपयांची नोट वापरून व्यवहार करीत असताना ग्राहकांकडून मात्र घोषणा पत्र (डिक्लेरेशन) घेतले जात आहे. ज्यात त्या ग्राहकाचे नाव, आधार आणि पॅन कार्डचा नंबर नमूद केला जात आहे. तसेच आपण दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून खरेदी केल्याचे त्यात नमूद केले जात आहे. तर काही सराफ व्यावसायिकांनी या नोटा २३ मेनंतरच घोषणा पत्रासह स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यंदाचा लग्न सरार्इचा कालावधी संपत आल्याने सराफ बाजार थोडा थंडावला होता. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे येथील उलाढाली वाढतील. शनिवारी (ता. २०) व्यवहारात मोठी तेजी नव्हती. मात्र खरेदी वाढली आहे. गेल्या वेळी नोटाबंदी केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती तसा गोंधळ यावेळी निर्माण होर्इल, असे वाटत नाही. खरेदीबाबत चौकशी वाढली आहे, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

अधिकचे पैसे घेऊन विक्री ?

नोटा बदलून घेण्यासाठी अनेकांची मागील नोटाबंदीच्या वेळी दमछाक झाली होती. त्यामुळे यंदा देखील अशीच परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून काही ग्राहक दोन हजार रुपयांच्या जादा नोटा देवून खरेदी करीत असल्याची देखील स्थिती आहे. प्रति दहा ग्रॅमसाठी बाजार भावापेक्षा पाच ते आठ हजार रुपये जादा देवून दोन हजार रुपयांच्या नोटा वापरून खरेदी केली जात आहे.

दागिन्यांची खरेदी केल्यानंतर दोन लाखांपर्यंतच रोख स्वरूपात रक्कम स्वीकारता येते. त्यानुसारच व्यवहार सुरू आहेत. व्यवहारात काहीशी वाढ आहे. मात्र मोठा परिणाम जाणवलेला नाही. कधीही नोटाबंदी होत असल्याने चलनावरील विश्‍वासहार्यता कमी झाली आहे.

- फत्तेचंद रांका, व्यवस्थापकीय संचालक, रांका ज्वेलर्स

नोट बंदीचा खूप मोठा परिणाम झाला असे दिसून येत नाही. जे ग्राहक खरेदीसाठी येत आहे, ते मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटा वापरत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. घोषणा पत्र घेऊन आम्ही या नोटा स्वीकारत आहोत. नोटा बदलण्यासाठी वेळ असल्याने जास्त गोंधळ होर्इल, असे वाटत नाही.

- विपुल अष्टेकर, संचालक, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर करून दागिन्यांची खरेदी करताना घोषणापत्र द्यावे लागत आहे. त्यात ग्राहकांचा आधार आणि पॅन नंबर असणार आहे. त्यामुळे कोणती किती व कशा प्रकारे खरेदी केली याची माहिती समजू शकणार आहे. सध्या सराफ बाजार स्थिर आहे.

अमित मोडक, कमोडिटीतज्ज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पीएनजी अँड सन्स

दागिणे मोडण्यासाठी आलेले ग्राहक दोन हजार रुपयांची नोट स्वीकारत नसल्याचे चित्र शनिवारी पचायला मिळाले. आता बुकिंग केले व नंतर दोन हजार रुपयांच्या नोटांद्वारे खेरदी केली तर चालेल का? दोन हजार रुपयांच्या किती नोटा स्वीकारता, अशा प्रकारची चौकशी केली जात आहे.

- प्रतीक संभूस, भागीरथी ज्वेलर्स

काही दिवसांपूर्वीच मी सोन्याचे दागिणे बुक केले होते. त्याची डिलिव्हरी घेण्यासाठी आज शॉपमध्ये आलो होतो. खरेदीसाठी मी माझ्याकडे असलेल्या काही दोन हजार रुपयांच्या नोटा देखील वापरल्या. दोन हजार रुपयांच्या नोटा देवून खरेदी करताना कुठेही अडवणूक झाल्याचा अनुभव आला नाही.

- राजेश साकोरे, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT