'छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच माझी सर्व पक्ष समभाव अशी भूमिका आहे.'
सातारा : आपल्याकडं लोकशाही आहे. तुम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आहेत. राजेशाही असती तर मी उत्तर दिलं असतं. लोकप्रतिनिधींनी वाईन विक्रीचा (Wine sales) निर्णय का घेतला, कशासाठी घेतला. ज्यांनी हा निर्णय घेतलाय त्यांनाच विचारा, असं सांगत भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर टीका केलीय.
खासदार उदयनराजे यांनी आज पुण्यातील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सातारा पालिकेच्या (Satara Municipality) हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ४८.५० कोटींचे अनुदान राज्य शासनानं उपलब्ध करावं, अशी मागणी केलीय. या भेटीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) ज्या प्रमाणं सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली, त्यानुसार माझी सर्व पक्ष समभाव अशी भूमिका आहे. अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर तुम्ही राष्ट्रवादीत (NCP) परत जाणार आहात का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आपली भूमिका व्यक्त केली.
मी भाजपचा (BJP) नेता म्हणून नव्हे, तर देशाचा नागरिक म्हणून बोलत आहे. प्रत्येकाला आपलं वैयक्तिक जीवन असतं. त्या व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर कसं वागायचं हा निर्णय त्यांचा त्यांनी घ्यायचा असतो. वाईनची विक्री बंद करा की नको, याबाबत लोकांनी विचार करायला हवा. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असं सांगत हेल्थ ईज वेल्थ.. हे लक्षात ठेवलं पाहिजे, असंही ते शेवटी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.