Bookspace in Kothrud sakal
पुणे

Bookspace in Kothrud : वाचकांच्या दुष्काळामुळे ग्रंथालयाला टाळे; कोथरूडमधील ‘बुकस्पेस’ झाले बंद

ग्रंथालये आणि वाचनालये म्हणजे पुण्याचे सांस्कृतिक वैभव. एकेकाळी पुण्यातील काही नामांकित ग्रंथालयांचे सभासद असणे, ही प्रतिष्ठेची बाब समजली जात असे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ग्रंथालये आणि वाचनालये म्हणजे पुण्याचे सांस्कृतिक वैभव. एकेकाळी पुण्यातील काही नामांकित ग्रंथालयांचे सभासद असणे, ही प्रतिष्ठेची बाब समजली जात असे. ग्रंथालयांचे दरवाजे उघडताच वाचकांची रीघ लागत असे. त्याच पुण्यात आज वाचकांनी पाठ फिरविल्यामुळे एका ग्रंथालयाला टाळे लावण्याची दुर्दैवी वेळ ओढवली.

कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीतील ‘बुकस्पेस’ नावाचे ग्रंथालय दोन दिवसांपूर्वी बंद झाले. व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले प्रसाद कुलकर्णी यांचे हे ग्रंथालय होते. केवळ पुस्तकांच्या प्रेमापोटी २०१४ मध्ये त्यांनी पदरचे लाखो रुपये खर्चून ग्रंथालय सुरू केले. काही वर्षे ते उत्तम चालले.

मधल्या काळात ग्रंथालयांची सभासद संख्या अडीच ते तीन हजारांवर पोहोचली होतील. पण हळूहळू सभासदांची संख्या रोडावू लागली. तरीही कुलकर्णी यांनी नेटाने ग्रंथालय सुरू ठेवले. अखेरीस ही संख्या २५-३० सभासदांवर येऊन ठेपल्याने त्यांचा नाइलाज झाला अन् वाचकांच्या दुष्काळामुळे ग्रंथालयाला कुलूप लागले.

या ग्रंथालयात जवळपास दोन लाख पुस्तकांचा खजिना होता. ग्रंथालय बंद करायचे ठरवल्यावर कुलकर्णी यांनी हा खजिना ५० ते ७५ टक्के सवलतीसह विक्रीसाठी खुला केला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी याबाबतचा संदेश आपल्या काही मित्रांना समाजमाध्यमांवर पाठवला. तो लगेचच व्हायरल झाल्याने दोन दिवसांपासून या ग्रंथालयात पुस्तक खरेदीसाठी वाचकांची रीघ लागली आहे. अवघ्या दोन दिवसांत सुमारे एक-सव्वा लाख पुस्तकांची विक्री झाली आहे.

‘‘अनेकदा माणूस जिवंत असताना कोणीही विचारपूस करत नाहीत; पण निधन झाल्यावर मात्र सगळेच दुःख व्यक्त करतात. ग्रंथालयाचेही जणू तसेच झाले आहे. ग्रंथालय सुरू होते, त्यावेळी वाचकांनी पाठ फिरवली. मात्र ग्रंथालय बंद करण्याचे ठरवल्यावर अनेकांनी निराशा व्यक्त केली,’’ अशी खंत प्रसाद कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

‘पुण्यातील अनेक ग्रंथालये बंद’

‘गेल्या दोन-तीन वर्षांत पुण्यातील १५ ग्रंथालये बंद झाली आहेत, याचा अनेकांना पत्ता नाही. ग्रंथालये असावीत, अशी गरज आज फार थोड्या लोकांना वाटते. वाचकांची संख्या निश्‍चितच वाढली आहे. नवीन पिढीतील मुलेही आवर्जून वाचत आहेत; पण ग्रंथालयांविषयीचा रस कमी झाला आहे. ग्रंथालये टिकवण्यासाठी प्रत्येकाने एखाद्या तरी ग्रंथालयाचे सभासदत्व घ्यावे,’ असे आवाहन कुलकर्णी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT