धानोरी, वाघोली, वडगाव शिंदे, लोहगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग व इमारतींची कामे चालू आहेत. या भागात जमिनीचे दर तिच्या स्थानानुसार (लोकेशन) ठरतात.
लोहगाव - लोहगावसह (Lohgaon) आजूबाजूच्या धानोरी, वाघोली आदी गावांचे जमिनीचे दर (Land Rate) गगनाला भिडले आहेत. मात्र लोहगाव वगळता इतर गावांमध्ये निवासी जमिनींचे रेडिरेकनरचे दर (Ready Reckoner Rate) प्रतिगुंठा साधारण वीस लाखांच्या वर आहेत. मात्र लोहगावमध्ये हेच दर आठ-नऊ लाखांच्या घरात आहेत. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी बुडत आहे.
धानोरी, वाघोली, वडगाव शिंदे, लोहगाव आदी भागात मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग व इमारतींची कामे चालू आहेत. या भागात जमिनीचे दर तिच्या स्थानानुसार (लोकेशन) ठरतात. तर रेडिरेकनर दरावर निबंधक कार्यालयाकडून खरेदी-विक्रीच्या वेळी मुद्रांक शुल्क आकारले जाते. मात्र लोहगाव भागात प्रतिगुंठा वीस-तीस लाखांनी विक्री होणाऱ्या जमिनींचे रेडिरेकनर दर केवळ आठ ते नऊ लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे खरेदी-विक्री करणारे लोक मुद्रांक शुल्क व सेस वाचवण्यासाठी याच रेडिरेकनरचा आधार घेतात व जमिनीचे दर कमी दाखवतात.
प्रत्यक्षात मात्र हे व्यवहार चालू बाजार भावाप्रमाणे होतात अन फरकातील जास्तीची रक्कम रोख म्हणजे काळ्या पैशांच्या स्वरूपात अदान-प्रदान केली जाते. यामुळे राज्य शासनाचे मुद्रांक शुल्क तर बुडतेच पण केंद्र सरकारचा आयकरही मोठ्या प्रमाणात बुडतो. त्यामुळे लोहगावमधील जमिनींचे रेडिरेकनर दर चालू बाजारभावाप्रमाणे करणे आवश्यक आहे. पुणे शहरात महापालिकेच्या हद्दीत निवासी क्षेत्राचा इतका कमी दर कसा काय असु शकतो ही आश्चर्याचीच बाब म्हणटले जात आहे. विशेष म्हणजे लगतच खराडी आहे खराडीतील जागांचे रेडीरेकनर दरही मोठे आहे असे असताना लोहगावचे रेडीरेकनर दर इतके कमी कसे याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.