Record of existence of leopards and other animals in Otur forest area Latest Marathi News  
पुणे

Otur Forest Range : ओतूर वनपरिक्षेत्रात पुन्हा बिबट्याचं दर्शन; तरस, चिंकारा अन् मोरांची संख्याही वाढली

पराग जगताप

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील वनपरिक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पोर्णिमेनिमीत्त ११ पाणवठ्यावर रात्र भर प्राणी गणना करण्यात आली. या प्राणीगणनेत ज्या बिबट्याचे मागील वर्षीच्या प्राणी गणनेत जंगलात अस्तित्व दिसले नव्हते, त्या बिबट्याचे ही या वर्षी पाणवठ्यावर दर्शन झाले आहे. त्याच बरोबर वनपरिक्षेत्र तरस, चिंकारा व मोर यांची संख्या ही वाढल्याचे दिसून आले असल्याची माहिती ओतूर वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

ओतूर येथील वनपरिक्षेत्रात मध्ये बुद्ध पोर्णिमेनिमीत्त वनविभागाकडून प्राणी गणना करण्यात आली. गुरूवारी ता.२३ रोजी बुद्ध पोर्णिमेनिमीत्त सायं. ६.०० वा. ते सकाळी ६.०० वा. पर्यंत ओतूर वनपरिक्षेत्रामध्ये ११ पाणवठ्याच्या ठिकाणी वन्यप्राणी गणना करण्यात आली. या वन्यप्राणी गणनेसाठी वनकर्मचारी यांनी पाणवठ्याशेजारी लपन करून, मचान बांधुन व ट्रॅप कॅमेरा लावून प्राणी व पक्षी यांचे जंगलातील अस्तित्वाची नोंद केली. यामध्ये तृनभक्षी, मांसभक्षी प्राणी व पक्षी दिसुन आले.

या प्राणी गणनेत मुख्यतः ससे, रानमांजर, उदमांजर, चिंकारा, निलगाय, तरस, भेकड, रानडुक्कर, सांबर, वानर, साळिंदर, मुंगुस, बिबट इत्यादी वन्यप्राणी दिसून आले.तर मोर, लांडोर, होला, किंगफिशर, कोयल बुलबुल, रानबगळा, बारबेट, रॉबिन इत्यादी पक्ष्यांचे अस्तित्व दिसुन आले.

सदर प्राणी पक्षी गणनेमुळे वन्यप्राणी व पक्ष्यांचे अस्तित्वाचे ठिकाण दिसुन आले व यानुसार वनविभागाला या प्राण्यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT