recruitment for the post of drug inspector stalled 25 months mpsc winter session politics marathi Sakal
पुणे

Pune News : औषध निरीक्षक उमेदवार न्यायाच्या प्रतिक्षेत; २५ महिन्यांपासून रखडली भरती

औषध निरीक्षक पदाची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला

सम्राट कदम

पुणे : राज्यातील दंतशल्यचिकित्सक आणि औषध निरीक्षकांची भरती मागील २५ महिन्यांपासून रखडली असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) प्रसिद्ध केलेल्या अंदाजित वेळापत्रकातही औषध निरीक्षक भरतीचा उल्लेख नाही. त्यामुळे निदान राज्याच्या हिवाळी अधिवेशनात तरी याची चर्चा होणार का, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.

औषध निरीक्षक पदाची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ नंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहिरात निघाली होती. औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकत होते.

या पदभरतीमध्ये तीन वर्ष अनुभवाची जाचक अट टाकल्याने प्रचंड विरोध झाला होता. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पदभरतीला स्थगिती दिली. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा अधिनियम जाहीर करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे भरती रखडली आहे.

सेवा अटींचा वाद

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या दंतशल्यचिकित्सक संवर्गातील २८९ पदांसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये एमपीएससीने जाहिरात काढली. मात्र, अनुभवांच्या सेवाअटींबद्दल स्पष्टता नसल्यामुळे एमपीएससीला पुढील कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे एमपीएससीने २६ एप्रिल २०२३ रोजी पत्र लिहीले आहे.

मात्र, अजूनही यासंबंधी स्पष्ट निर्देश नसल्यामुळे ही भरती रखडली आहे. तर दुसरीकडे औषध निरीक्षक पद भरतीही अनुभवाच्या सेवाअटींमुळे वादात सापडली असल्यामुळे दोन वर्षांआधी स्थगित करण्यात आली आहे. सध्या लाखो उमेदवार या पदभरतीची प्रतीक्षा करत असून २५ महिन्यांपासून वर्षांपासून नव्याने जाहिरातच आलेली नाही.

उमेदवार म्हणतात..

- २५ महिन्यांनतर तरी सेवा अटींचा सुधारित अध्यादेश निघणार का?

- मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाही भरतीसाठी सरकारची उदासीनता का?

- वैद्यकीय शिक्षण विभाग स्पष्टीकरण का देत नाही?

- उमेदवारांना किती दिवस झुलत ठेवणार?

- अधिवेशनात तरी न्याय मिळेल का?

एमपीएससीमार्फत औषध निरीक्षकांची पदभरती होणार असल्याने माझ्या सारख्या अनेकांनी खासगी नोकरी सोडून अभ्यासाला सुरवात केली. पण, सेवा अटींच्या वादात मागील २५ महिन्यांपासून भरती रखडली आहे. लवकरच अध्यादेश काढणार असल्याचे सरकार मागील १५ महिन्यांपासून सांगत आहे. आता तरी आम्हाला न्याय मिळणार का?

- दिपक, उमेदवार

रिक्त पदांची संख्या...

  • दंतशिल्यचिकित्सक : २८९

  • औषधनिरीक्षक : ११७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT