Accident  Esakal
पुणे

Accident : रेडीमिक्स टँकर व ऑटोरिक्षामध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, पाचजण जखमी

पुणे - सोलापूर महामार्गावर रेडीमिक्स टँकर व ऑटोरिक्षामध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

कृष्णकांत कोबल

मांजरी - पुणे - सोलापूर महामार्गावर रेडीमिक्स टँकर व ऑटोरिक्षामध्ये झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या इतर पाच जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास येथील सिद्धिविनायक पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.

नन्हे चव्हाण (वय ३५, सध्या रा. महादेवनगर, मांजरी बुद्रुक, मूळ कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. विष्णू प्रताप सिंह (वय ३८), पद्युम्न नरसिंह राज (वय २६), रवींद्र चव्हाण (वय ४३ ), सुनील संतोष पुराहा (वय २०)  बेचू चव्हाण (वय ४५ सर्व राहणार महादेव नगर मांजरी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो प्रवासी रिक्षा मांजरीफाटा चौकातून लोणी काळभोरच्या दिशेने जात होती. रिक्षामध्ये पाच कामगार प्रवासी बसले होते. येथील सिध्दीविनायक पेट्रोल पंपासमोरील चौकात सिग्नल नसतानाही रिक्षाने समोरील दुचाकीला कट मारण्याच्या नादात उजव्या बाजूने शहराकडे निघालेल्या रेडिमिक्सची वाहतूक करणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिली.

त्यामध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी नन्हे चव्हाण रस्त्यावर पडला असता अंगावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. तर इतर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मिक्सरचालक पळून गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT