Plastic Recycling  sakal
पुणे

Plastic Recycling : प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी ‘एनसीएल‘चे संशोधन;पायरॉलिसीस प्रकल्पाची उत्पादकता वाढविणार; सुचविले महत्त्वपूर्ण बदल

शहरात निर्माण होणाऱ्या फक्त ३५ टक्के प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या विघटनातून (पायरॉलिसीस) डिझेल निर्मितीच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

सम्राट कदम

पुणे : शहरात निर्माण होणाऱ्या फक्त ३५ टक्के प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या विघटनातून (पायरॉलिसीस) डिझेल निर्मितीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. मात्र दर्जेदार डिझेल उत्पादनाअभावी बहुतेक प्रकल्प बंद पडले असून, दोन-तीन प्रकल्पच सध्या फायद्यात आहे. म्हणूनच पायरॉलिसीस प्रकल्पांच्या उत्पादनवाढीवर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) संशोधन सुरू असून, महत्त्वपूर्ण बदलही सुचविण्यात आले आहेत.

एनसीएलच्या बहुवारीक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे डॉ. समीर एच. चिखली यांच्या नेतृत्वात डॉ. एच. व्ही. पोळ, डॉ. नंदिनी देवी, डॉ. परेश ढेपे, डॉ. सत्यम वासिरेड्डी, डॉ. एन. बारसू, डॉ. रमेश सामंता ही शास्त्रज्ञांची टीम यावर संशोधन करत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडून (सीएसआयआर) मिशन मोड प्रोजेक्ट म्हणून प्लास्टिकच्या पुनर्वापरावर संशोधन सुरू आहे.

डॉ. चिखली म्हणाले, ‘‘प्लास्टिकपासून डिझेलची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधून मिळणारे इंधन व्यावसायिक दर्जाचे नसल्याने आर्थिकदृष्ट्या तोटा सहन करावा लागत आहे. म्हणूनच एनसीएल प्लास्टिक वेचक संस्थेच्या साहाय्याने पायरॉलीसीसवर संशोधन करत आहे. त्यासाठी एनसीएलमध्येच एक ते दोन किलो क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. २०२२ पासून एनसीएल यावर संशोधन करत असून, काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे हाती लागली आहेत.’’

महत्त्वाचे निष्कर्ष

  • सर्वच प्रकारचे प्लास्टिक पायरॉलीसीससाठी वापरल्यामुळे डिझेलचा दर्जा घसरतो

  • पॉलिप्रोपिलिन आणि पॉलीइथिलीन या प्लास्टिक पासूनच डिझेलची निर्मिती गरजेची

  • वर्गीकरणासाठी सुलभ आणि फायदेशीर पद्धतीची गरज

  • पुण्यातील प्लांटमध्ये तापमानात बदल करणे गरजेचे

  • विलगीकरण केल्यानंतरच प्लास्टिकचा वापर हवा

एनसीएलने सुचविलेले बदल

  • कच्चा माल म्हणून फक्त पॉलिप्रोपिलिन आणि पॉलीइथिलीनचा वापर गरजेचा

  • पायरॉलिसीसची प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने करणे गरजेचे

  • डिझेल ग्रेड इंधनाच्या निर्मितीसाठी उत्प्रेरकाची निर्मिती

एआय आधारित विलगीकरण

प्लास्टिकच्या विलगीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) संयंत्र विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे विनाकारण लागणारे मनुष्यबळ कमी होईल, पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होणार आहे. तसेच विलगीकरण केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर आणि डिझेल निर्मितीसाठी फायदा होईल.

एनसीएलमध्ये मिनी मॉडेल

पायरॉलीसीस प्रकल्पाच्या संशोधनासाठी एनसीएलमध्येच दोन किलो क्षमतेच्या प्लांटची निर्मिती करण्यात आली. निष्कर्षांच्या आधारे प्रत्यक्ष पायरॉलीसीस प्रक्रियेत बदल केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT