email 
पुणे

ईमेल हॅक करून पाठविला राजीनामा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंटरनेट, सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक, बदनामी करण्याचे प्रकार सातत्याने घडतात. मात्र, एखाद्याचा ईमेल हॅक करून त्याच्या नोकरीचा राजीनामा कंपनीला पाठविला तर काय होईल ? खरोखरच एका नामांकित कंपनीच्या वाहनांच्या शोरुमच्या संचालकाचा ईमेल हॅक करून त्याद्वारे कंपनीला राजीनामा पाठविण्यात आला. कंपनीनेही ‘त्या’ ईमेलची दखल घेत, संचालकाला नोकरीवरून कमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणी औंध येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे लष्कर परिसरातील मोलेदिना रोड येथे एका नामांकित कंपनीच्या कार शोरूममध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते संबंधित कंपनीमध्ये काम करीत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा ई-मेल हॅक करण्यात आला. त्यानंतर हॅकरने फिर्यादी यांच्या नावाने संबंधित कंपनीला ईमेलद्वारे त्यांच्या नोकरीचा राजीनामा पाठवून दिला. कंपनीनेही संबंधित ईमेलद्वारे पाठविलेल्या राजीनाम्याची खातरजमा केली नाही. तो राजीनामा मंजूर करून, त्यांना नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर त्यांनी कंपनीला विचारणा केली. त्या वेळी त्यांनीच पाठविलेल्या राजीनाम्याच्या ईमेलची दखल घेऊन, त्यांना कामावरून कमी केल्याची भूमिका कंपनीने घेतली. या प्रकारामुळे फिर्यादी यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elcid Investments Share Price: जुलै महिन्यात ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार; MRF चं रेकॉर्ड मोडलं

Sports Bulletin 29th October : न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेत भारतीय महिला संघाची बाजी ते स्मृती माधनाचे विक्रमी शतक

INDW vs NZW: Smriti Mandhana चे विक्रमी शतक अन् भारताने सामन्यासह जिंकली मालिका

Rahul Gandhi: ''अदानींच्या एकाधिकारशाहीला सरकारचे संरक्षण'', राहुल गांधींचा गंभीर आरोप

Government Jobs: पेपरफुटीच्या कायद्यामुळे महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांवरचं विघ्न टळलं, एक लाख उमेदवारांची निर्विघ्न भरती

SCROLL FOR NEXT