Shivare People Agitation Sakal
पुणे

Ringroad : रिंगरोड साठी शिवरे येथे भुसंपादन होऊ देणार नाही; शिवरे ग्रामस्थांचा निर्धार

रिंगरोडसाठी भूसंपादन होऊ न देण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने महामार्गावर पशुधनासह रास्तारोको आंदोलन.

किरण भदे

नसरापूर - नियोजीत पुर्वीच्या आराखड्या प्रमाणेच रिंगरोड करावा नव्याने बदल केलेल्या आराखड्या प्रमाणे शिवरे गावात भुसंपादन होऊ देणार नाही, असा निर्धार करत शिवरे, ता. भोर ग्रामस्थांनी आज पुणे सातारा महामार्गावर गाई म्हशींसह रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या या आंदोलनात पोलिस अधिकारी व भोर तहसिलदार यांनी या बाबत निश्चित तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.

रिंगरोडचा जुना आराखडा बदलुन नव्याने अधिसुचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये शिवरे गावामधील सुमारे 223 एकर बागायती क्षेत्र जात आहे हे नव्याने केलेले नियोजन त्वरीत बदलुन जुन्या आराखड्या प्रमाणे रिंगरोड व्हावा यासाठी शिवरे ग्रामस्थ गेले.

अनेक दिवस विवध राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नेते मंडळी, मंत्री यांच्याकडे चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही याचा निषेध करत आज ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बराच वेळ महामार्ग रोखुन धरण्यात आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाहनांची मोठी रांग लागलेली होती. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रस्त्यातुन बाजुला केले यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या आंदोलनात शिवरेच्या सरपंच अमृता गायकवाड, उपसरपंच योगेश दळवी, माजी उपसरपंच माऊली डिंबळे, सूर्यकांत पायगुडे, कृष्णा डिंबळे, सोपान डिंबळे, निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, अतुल इंगुळकर, सुनील डिंबळे, पंढरीनाथ डिंबळे, तसेच रिगंरोड बाधित गराडे ता. पुरंदर गावातील काही ग्रामस्थ अँडव्होकेट भास्कर जगदाळे यांच्या समवेत उपस्थित होते. आंदोलनाला ग्रामस्थांसह महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.

यावेळी बोलताना माजी सरपंच माऊली डिंबळे यांनी सांगितले कि, जुन्या रचनेमध्ये जिरायती व डोंगराळ भागातुन रस्ता जात असताना तो जाणिवपुर्वक बदलला आहे. व नव्या रचनेत शिवरे गावा मधुन 223 एकर बागायती क्षेत्र जात असल्याने संपुर्ण गावच उध्वस्त होत आहे हे आम्ही होऊ देणार नाही. या आंदोलनाची योग्य दखल घेतली गेली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर या पेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

कृष्णा डिंबळे यांनी बोलताना सांगितले कि, शिवरे गावामध्ये यापुर्वी देखिल टाँवर लाईनसाठी, महामार्गासाठी, बोरमाळ ते बनेश्वर मार्गासाठी जमिन संपादीत झाली आहे. त्यामध्ये रिगंरोडसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात संपादन झाल्यास गावाचे अस्तित्वच संपणार आहे. रिंगरोड डोंगरी व जिरायती भागातुन जावा कोणाचेही ऩुकसान व्हावे, अशी आमची भुमिका नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राम लथड, भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तानाजी बर्डे, रेखा वाणी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील प्रशासनाच्या वतीने उपस्थित होते.

तहसिलदार सचिन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, शिवरे ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात या आंदोलनाला अगोदरच गुरुवारी ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली आहे. व या विषयासंदर्भात संबधीत विभागाने वरिष्ठ अधिकारयांशी बोलुन सकारात्मक प्रस्ताव सादर करुन बैठकीचे अयोजन करण्याचा सुचना दिल्या आहेत त्याची आमंलबजावणी होईल.

सर्व अधिकारयांनी गावच्या भुसंपादनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. व न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT