डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ  sakal
पुणे

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

संतोष आटोळे

इंदापूर : तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर च्या हद्दीत रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेल्या मालवाहतूक वाहनातील अंधाराचा फायदा घेऊन डिझेल चोरीच्या घटनांसह वाहनचालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक वेळा संबंधित वाहन चालक हे परराज्यातील गुन्हा दाखल करण्यासाठी येत नाहीत.

यामुळे अशा घटनांमध्ये वाढत होत चालली असून याबाबत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्ग हा सतत वर्दळीचा महामार्ग म्हणून गणला जातो.

या मार्गावरील नियमित मालवाहतूक अवजड वाहनांची ये जा होत असते. अशावेळी चालक रात्रीचा प्रवास टाळून विश्रांती घेण्यासाठी एखाद्या हॉटेलच्या कडेला रस्त्याच्या बाजूला, पेट्रोल पंपावर थांबत असताना अशा वेळी गाडीचे ड्रायव्हर हे बऱ्याच वेळा एकटेच असतात याचाच डिझेल चोरनारे भुरटे चोर फायदा घेत असल्याचे दिसत असून गाडीतील डिझेलसह चालकाचे पैसे व मोबाईल इतर साहित्य घेऊन चोरी करून ही टोळी फरार होत आहे.

यामध्ये विशेष म्हणजे अनेक चालक राज्याच्या इतर भागातील किंवा बाहेरच्या राज्यातील असल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत नाहीत.मात्र सध्या याचच हे चोर फायदा घेत असून महामार्गावर अशा भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे.

1 ऑक्टोबर रोजी पुणे -सोलापूर महामार्गवर वनगळी गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या सुरक्षारक्षाने चोरांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने चोरांनी डिझेल रस्तावर ओतुन पळ काढल्याची घटना घडली आहे. मात्र या प्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस स्टेशन येथे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Amitabh Bachchan : जेव्हा अमिताभ दिवसाला 200 सिगारेट्स ओढायचे आणि होतं या गोष्टीचं जबरदस्त व्यसन ; "मी तेव्हा हाताला..."

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT