Pune  sakal
पुणे

Pune : तरवडेवस्ती येथील पुलाचा कठडा वाहून गेल्याने अपघाताचा धोका

वाहनचालकांसह स्थानिकांची तक्रार

अशोक बालगुडे

उंड्री : महंमदवाडीतून तरवडेवस्तीमार्गे वानवडीकडे जाणाऱ्या रस्ता परतीच्या उखडला असून, तरवडेवस्ती येथील ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पालिका प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करून ओढ्यावरील कठड्याला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

तरवडेवस्ती रस्त्यावरील ओढ्यालगत मोठी झाडे असून, थेट वळण असल्याने सोमरून येणारी वाहने दिसत नाहीत. रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका वाढला आहे. पुलाच्याच्या बाजूला कचरा साचला असून, त्यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. या रस्त्यावरून पाण्याच्या टँकरसह इतर वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सबुरीचा सल्ला दिनकर लोंढे, कृष्णमूर्ती अय्यर, योगेश ससाणे, बन्सीधर सरापणे, आनंद पवार यांनी दिला.

दिवाळीच्या सुटीनंतर शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे अनेक मुले सायकलवरून ये-जा करीत असतात, त्यांच्या सुरक्षेसाठी रस्ता आणि ओढ्यावरील कठडा दुरुस्त करण्याची गरज आहे.

- बाळासाहेब घुले, महंमदवाडी

दरम्यान, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, रस्ता आणि ओढ्यावरील पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीसाठी मुख्य पथविभागाकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT