पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी भेट दिली. यावेळी पुण्यातल्या सर्वात वर्दळीचे समजले जाणारे रस्ते, जे एरवी ट्रॅफीक जॅमसाठी पुणेकरांची डोकेदुखी ठरतात ते रस्ते आज बऱ्याच काळासाठी निर्मनुष्य होते.
आज पुणेकरांनी पंतप्रधान मोदींना बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केल्याचे बघायला मिळाले. पण हे रिकामे रस्ते बघणे ही सुद्धा पुणेकरांसाठी पर्वणीच ठरली असणार.
विद्यापीठ चौक, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर रस्ता, बालगंधर्व चौक, लक्ष्मी रस्ता, बुधवार पेठ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर हे सर्वच कायमच प्रचंड गर्दीचे रस्ते म्हणून ओळखले जाता. चक्क शरद पवारही काल म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या आदल्या दिवशी विद्यापीठ रस्त्यावर ताटकळले होते.
त्यातही यापैकी काही रस्त्यांवर सुरू असलेले मेट्रोचे काम, खराब झालेली रस्त्यांची अवस्था, पावसाच्या पाण्याने खड्ड्यातले रस्ते अशा काहीशी पुण्याची दुरावस्था असल्याने हे रस्ते पार करणे पुणेकरांसाठी रोज दिव्य पार केल्यासारखे असते.
जी २० च्या वेळी चेहरा न धुता मेकअप थापल्या प्रमाणे पुण्याला सजवण्यात आले होते. तशीच काहीशी पुनरानुभूती आजही पुणेकरांनी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा हा मुद्दा महत्वाचा आहेच. पण यावेळी पंतप्रधानांचा ताफा विद्यापीठ रस्त्यावरून काही मिनीटांमध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहचला.
हे वाक्य ऐकणे पुणेकरांसाठी जेवढे सुखावह आहे तेवढेच दुःखदही आहे. कारण हाच रस्ता पार करण्यासाठी सामान्य नागरिकांना मिनीटे नव्हे तर तासभर वेळ लागतो.
याला जबाबदार कोण? हा प्रश्न प्रशासनाच्या मनाला कधी भीडतो की, नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. विद्यापीठ रस्त्याची अनेक वर्षांपासून झालेली दुरावस्था कधी सुधारणार हा मोठा प्रश्न आहे. आधी विद्यापीठ चौकातला फ्लाय ओव्हर तोडला, नंतर मेट्रोचे काम सुरु झाले यामुळे त्या रस्त्याने संध्याकाळी ५नंतर प्रवास करणे म्हणजे पुण्याहून मुंबईला आपण लवकर पोहचू अशी अनुभूती देणारा असतो.
रस्त्यांची ही नियोजन शून्यता, पुणेकरांची मानसिक आणि वाहतुक कोंडी सरकारपर्यंत कधी पोहचणार असा प्रश्न पुणेकरांनी विचारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.