road chamber sakal
पुणे

Road Chamber Issue : चेंबरमुळे वाहनचालक ‘खचले’; दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असताना कुठे खड्डा आहे त्याचा अंदाज येत नाही. त्यात परत अचानक खचलेल्या चेंबरमध्ये वाहने आदळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असताना कुठे खड्डा आहे त्याचा अंदाज येत नाही. त्यात परत अचानक खचलेल्या चेंबरमध्ये वाहने आदळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून पावसाळी गटारांचे चेंबर, मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरची दुरुस्ती केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी शहरात अनेक ठिकाणी चेंबर खचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मुसळधार पाऊस पडला की, शहरातील रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात होते. खड्डे पडण्यास रस्त्यातील चेंबर्स कारणीभूत ठरतात. पथ विभागाकडून शहरात पावसाळी गटारांच्या दुरुस्तीचे काम केले जाते, तर मलनिस्सारण विभागाकडून सांडपाणी वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या गटारांची स्वच्छता करता यावी, यासाठी ठरावीक अंतरावर चेंबर तयार करून त्याला झाकण लावले जाते.

पथ विभाग आणि मलनिस्सारण विभागाकडून १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी पावसाळी गटार आणि सांडपाण्याचे गटार यांच्या देखभाल दुरुस्ती, चेंबर बांधणे, झाकण बदलणे यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची निविदा काढली जाते. त्यातून ठेकेदारांकडून ज्या ठिकाणी चेंबर खचल्याचे दिसते तेथे लगेच दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

मात्र, नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय किंवा चेंबरचे झाकण वाहनांच्या वजनाने फुटल्याशिवाय त्याकडे लक्ष दिले जात नाही. पथ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सात कार्यकारी अभियंत्यांच्या हद्दीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासह चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत ६०५ चेंबर दुरुस्त केलेले आहेत.

अशी आहे स्थिती

  • पावसाळी गटार व सांडपाण्याची गटारे रस्त्याच्या कडेने न टाकता ती मध्य भागातून टाकण्यात आलेली आहेत

  • शहरात ५७ हजार ५०० पावसाळी चेंबर आहेत, तर सांडपाणी गटारांच्या चेंबरची संख्या सुमारे एक लाख ५० हजार इतकी

  • बहुतांश चेंबर रस्त्याला समपातळीत नाहीत

  • काही ठिकाणी चेंबर खाली आणि रस्ता वर

  • काही ठिकाणी चेंबरची उंची जास्त आणि रस्ता खाली

  • रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली असलेल्या चेंबरच्या झाकणावर पावसाळ्यात पाणी जमा होते व चेंबर दिसत नसल्याने त्यात गाडी आदळते

  • दुचाकीस्वारांची तर तारांबळ उडते

  • अनेकदा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होतात

पथ विभागाकडून खड्डे बुजविण्यासह पावसाळी गटारांचे चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या गेल्या वर्षभरात ६०० पेक्षा जास्त चेंबर दुरुस्त केले आहेत. ज्या ठिकाणी चेंबर खराब झाले आहेत तेथे लगेच दुरुस्ती केली जात आहे.

- बाळासाहेब दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग

शनिवारी जोरात पाऊस पडला तेव्हा धायरीतील रस्त्यावर सर्वच पाणी जमा झाले होते. त्या वेळी चेंबरचा खड्डा लक्षात न आल्याने त्यात दुचाकी जोरात आदळली. गाडीवरून पडता पडता थोडक्यात वाचलो. महापालिकेने चेंबर रस्त्याच्या पातळीत न आणल्याने असे प्रकार होत आहेत.

- श्रीकांत कुलकर्णी, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT