road construction katraj kondwa road repair pathole administration pmc  sakal
पुणे

Pune News : रुंदीकरण नंतर करा; आधी किमान खड्डे बुजवा; रस्त्याच्या कडेला डबकी साचल्याने नागरिकांतून संताप

कात्रज-कोंढवा रस्त्याची परिस्थिती दयनीय; झोपलेले प्रशासन जागे होईल का?

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण आणि त्यातच पावसामुळे पडलेल्या खड्ड्याने रस्त्याची अवस्था आणखीनच दयनीय झाली आहे. त्यामुळे रुंदीकरण नंतर करा, आधी किमान खड्डे बुजवा अशी संतप्त हाक प्रशासनाला नागरिकांतून देण्यात येत आहे.

मात्र, झोपलेले प्रशासन जागे होईल का? आणि कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. माउलीनगर बसथांबा, एसबीआय बँकेसमोर अशा अनेक ठिकाणी रस्त्याच्या सखल भागात पाणी साचून तयार होत असलेल्या डबक्यांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच, अनेक ठिकाणी परिसरातील सांडपाणी रस्त्यावर सतत वाहत असते. त्यामुळे मोठी डबकी तयार होतात. त्यामुळे पायी चालणाऱ्या व दुचाकी चालकांच्या अंगावर घाण पाणी उडते. त्यातून वाद होण्याच्या घटनाही घडत आहेत. तसेच, या डबक्यांमुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरून एका तासाला साधारणतः ७ ते ८ हजार वाहनांची वाहतूक होते. यामध्ये अवजड वाहनाचे प्रमाण लक्षणीय आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यातच खड्डे पडल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून किमान साईडपट्ट्यांची दुरुस्ती करुन दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता हा पाच वर्षांपासून मोठा रस्ता आणि चांगला होणार असल्याचे ऐकत आलो आहे. आतातर २०० कोटी दिल्याच्या बातम्या पाहिल्या अन् रस्ता रुंदीकरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु रुंदीकरण नंतर करा पण, आधी खड्डे दुरुस्त करुन आहे तो रस्ता तरी व्यवस्थित करा ही आमची मागणी आहे.

- स्थानिक नागरिक

या रस्त्यावर ड्रेनेज आणि विद्युत विभागाचे काम करणे बाकी असल्याने आम्ही त्याठिकाणी काम करु शकत नाही. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन खड्डे बुजविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल.

- व्ही जी कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT