pune transport esakal
पुणे

Viral Video : पुण्यातील रस्त्यावर खड्डेच खड्डे! नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर संताप

मेट्रोमुळे रस्त्याच्या चाळण झाली आहे आणि त्यामुळे आमच्या कंबरेचा खुळखुळा झाला आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यातील रस्त्यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आयटी कंपनीत काम करणारा तरूण हिंजवडीला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या खड्ड्याविषयी बोलताना दिसत आहे. तर खड्ड्यामुळे सामान्य नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतोय ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हिंदी आणि मराठी भाषेचा वापर करून हा तरूण बोलताना दिसत आहे.

"माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, आमची कंपनी घरापासून जवळपास ३० किलोमीटर आहे. जाऊन येऊन ६० किलोमीटर प्रवास करावा लागतोय, हिंजवडीच्या एका कुठल्यातरी कोपच्यामध्ये आमची कंपनी आहे आणि रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे सरकारने काहीतरी करायला पाहिजे.

मेट्रोच्या कमामुळे तर रस्त्याची सगळीच चाळण झाली आहे. यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सध्या पावसामुळे अनेक त्रास होतोय पण सरकार काही सुधरत नाही, काहीतरी करा आणि आम्हाला वाचवा, नाहीतर आम्हाला कुठल्यातरी ट्रकखाली पडून जीव द्यावा लागेल.

दरम्यान, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ चांगलाच शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "म्हणून मी हिंजवडीतच राहायला आले.. पण नशीब बघा, पुढचा जॉब डायरेक्ट येरवड्यात.. आता माझी पण तीच अवस्था... 55 किमी येऊन जाऊन... मेट्रोला आता भविष्यकालीन स्वप्न म्हणून जाहीर करून टाका.. जे पूर्ण होताना आपण आपल्या हयातीत बघू शकणार नाही.." अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT