कोथरूड : विविध विकासकामांसाठी रस्त्यांची खोदाई केली जाते. काम झाल्यानंतर तो रस्ता पूर्ववत करणे ही जबाबदारी संबंधित ठेकेदार व कामांना मंजुरी देणाऱ्यांची आहे. परंतु रस्त्याची किरकोळ डागडुजी करून वेळ मारुन नेली जाते. परिणामी रस्त्याच्या कामावर केलेली ही मलमपट्टी म्हणजे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी बनत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनचालकांना जो त्रास होतो, त्याचा पैसा हा संबंधित देणार आहेत का? असा संतप्त सवाल बावधन येथे राहणाऱ्या राकेश धोत्रे यांनी उपस्थित केला आहे.
धोत्रे म्हणाले, की ‘एमएनजीएल’ची अर्धवट कामे आणि महापालिकेने रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनदेखील बावधन बुद्रुकच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना तर अक्षरशः जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांकडे लक्षच देत नाहीत. महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्यांची रखडलेली कामे पूर्ण करावीत. अन्यथा आम्हाला टिकाव फावडे घेऊन महापालिकेवर यावे लागेल, अशा इशारा धोत्रे यांनी दिला.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास वाढला आहे. आम्ही व्यवस्थित कर भरतो. महापालिकेच्या अधिकारी व अभियंत्यांना वेळच्यावेळी पगार मिळतो. तरीसुद्धा ही मंडळी पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, तर त्यांना कामावर कशाला ठेवायचे? नागरिकांचा अपघात झाला वा औषधोपचारावर खर्च करावा लागला, तर तो या अधिकाऱ्यांच्या संपत्तीतून जप्त करून घ्यावा. म्हणजे सर्व कामे व्यवस्थित होतील.
- दत्ता कंधारे, नागरिक
यासंदर्भात आम्ही मुख्य खाते आणि पथविभागाला कल्पना दिली आहे. त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल.
- सचिन तामखेडे, क्षेत्रीय अधिकारी, कोथरूड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.