Kas Plateau esakal
पुणे

‘रॉक पूल’ पठारांवरील जैवविविधतेला जगविण्यासाठी अत्यंत उपयुक्त : संशोधन

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : पश्‍चिम घाटातील बहुतांश पठारावर अनेक छोटी तळी किंवा ‘रॉक पूल’ आढळतात. या तळ्यांमधील पाणी पठारांवरील जैवविविधतेला जगविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची तसेच हे पिण्यायोग्य असण्याची बाब नुकतीच एका संशोधनातून समोर आली आहे.

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या (एआरआय) वतीने ‘वॅनिशिंग वॉटर्स: वॉटर केमिस्ट्री ऑफ टेम्प्ररी रॉक पूल्स ऑफ वेस्टर्न घाट’ या नावाचा एक शोधनिबंध नुकतात प्रकाशित झाला यात ही बाब समोर आली आहे. या संशोधनामध्ये संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. कार्तिक बालासुब्रमनीयन, डॉ. प्रणव क्षीरसागर, डॉ. मंदार दातार यांच्या मार्गदर्शनाखाली अबोली कुलकर्णी, एम विग्नेश्वरन, स्मृती विजयन, भूषण शिगवण, सुरजित रॉय आदींनी सहभाग घेतला. हा संशोधन प्रबंध नुकताच ‘वॉटर प्रॅक्टीस अँड टेक्नॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

याबाबत डॉ. कार्तिक यांनी सांगितले, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पीण्यायोग्य पाण्यासाठी दिलेल्या मापदंडानुसार पश्‍चिम घाटातील या ‘रॉक पूल्स’ मध्ये उपलब्ध असलेले पाणी नेमके कसे आहे?, ते पिण्यायोग्य आहे का? याचा अभ्यास करण्यात आला. यासाठी पश्‍चिम घाटातील ३३ पठारांवर तयार झालेल्या ८० रॉक पूल्सचे सर्वेक्षण करत त्यांच्या रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला. पाण्याचा सामू, कंडक्टीव्हीटी, त्यातील अनायन, सल्फर, मॅग्निशियम आदी घटकांचा अभ्यास करण्यात आला.’’

‘रॉक पूल्स’ म्हणजे काय ?

सह्याद्रीतील पठारांवर नैसर्गिकरित्या तयार झालेले खड्डे, ज्यात वर्षानुवर्षे पावसाचे पाणी साचून निर्माण होणारी परिसंस्था म्हणजेच ‘रॉक पूल्स’. यातील पाण्याच्या गुणवत्तेनुसार तेथील जैवविविधता बदलत असते. या अधिवासात अनेक प्रदेशनिष्ठ प्राणी व वनस्पतींच्या जाती आढळतात.

संशोधनातील महत्त्वाच्या बाबी:-

  • महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ येथील ८० रॉक पूल्सचे सर्वेक्षण

  • पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याने प्रदेशनिष्ठ प्राणी व वनस्पतींना वाढण्यासाठी उपयुक्त

  • कोकणातील काही ‘रॉक पूल्स’मध्ये सल्फेट आणि मॅग्निशियमचे प्रमाण जास्त

  • पठाराच्या भागातील शेतांमध्ये वापरली जाणारी खते किंवा जवळच्या उद्योगांमुळे रॉक पूल्सच्या पाण्यावर परिणाम

संशोधनाचा फायदा ः

  • ‘रॉक पूल’च्या परिसंस्थेचा अभ्यास

  • यावर अवलंबून असलेल्या जैवविविधतेचे महत्त्व

  • पाण्याच्या रासायनशास्त्राच्या अभ्यासातून जैवविविधतेला समजणे शक्य

‘‘रॉक पूल्सच्या पाण्याचा रसायनशास्त्र अभ्यास पहिल्यांदाच करण्यात आला आहे. रॉक पूल्स ही पूर्णपणे वेगळी परिसंस्था असून याचा फारसा अभ्यास केला जात नाही. हे संशोधन भविष्यात केल्या जाणाऱ्या अभ्यास किंवा संशोधनासाठी पाया ठरेल.’’

- डॉ कार्तिक बालासुब्रमनीयन, आघारकर संशोधन संस्था

‘‘आम्ही गेली काही वर्षे पठारांवरील वनस्पतीजीवनाचा अभ्यास करत आहोत. नुकताच केलेला पठारावरील छोट्या तळ्यामधील पाण्याचा अभ्यास आम्हाला पठारांवरील वनस्पती विविधतेची सद्यस्थिती आणि त्यामागची कारणे जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.’’

- डॉ. मंदार दातार, आघारकर संशोधन संस्था.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT