Rohit Pawar Esakal
पुणे

Rohit Pawar: "गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं..!कुठंय तुमचं कायद्याचं राज्य?"; फडणवीसांसह अजितदादांना रोहित पवारांचा संतप्त सवाल

Rohit Pawar: कल्याणीनगरमध्ये प्रकरणामुळे विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच इंदापुरात आणखी एक धक्कादायक घटना घडली. इंदापुरात तहसीलदारांवर हल्ला करून त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावरून रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातील कल्याणीनगर भागातील हिट अँड रन प्रकरणानंतर सर्वजण संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला भेट देत पत्रकार परिषदही घेतली. पण या प्रकरणामुळे विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशातच इंदापुरात आणखी एक धक्कादायक घटना घडली. इंदापुरात तहसीलदारांवर हल्ला करून त्यांच्या डोळ्यात चटणी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या या संपुर्ण घटनांबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी हल्लाबोल केला आहे.

रोहित पवारांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीचं खापर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्यावर फोडलं आहे. त्यांनी इंदापुरमधील घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या एका वक्तव्याची आठवण करून देत हल्लाबोल केला आहे.

या फोटोसोबत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या असं म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवारांचं नेमकं ट्विट काय..?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे. "देवेंद्र फडणवीससाहेब, तुम्ही म्हणाला होतात की,‘‘ गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जिवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भरदिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता…आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या! देवेंद्र फडणवीससाहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यांच एका वक्तव्याची आठवण करून देत निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

SCROLL FOR NEXT