Rohit Pawar Write Facebook Post Pune District Lockdown 
पुणे

पुण्यात अजित पवारांनी लॉकडाऊन केलं अन् रोहित पवार म्हणतात... 

अशोक गव्हाणे

पुणे : पुण्यात उद्या रात्रीपासून म्हणजे १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून पाच दिवसासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोराना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शुक्रवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेतला होता. त्यांनंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संचारबंदीची घोषणा केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी अर्थिक नुकसान हे मोठे असले तरी पुण्यातील लॉकडाऊन हे लोकांच्या हितासाठीच घेतले असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहत आपले मत व्यक्त केले आहे.

रोहित पवार म्हणतात...
गेल्या काही दिवसांपासून मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून "दादा काळजी घ्या..., तुम्ही खूप लोकांमध्ये फिरता..." अशी विनंती केली. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएपच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण काळजी व्यक्त करत कोरोनाबाबत दक्षता घेण्यास सांगतात. या सर्वांचं अंतकरणापासूनचं हे प्रेम आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. कोरोनाचं प्रमाण वाढतंय.. हे खरं आहे. पण म्हणून आपण घरात बसून चालणार नाही. मी वारंवार सांगतो की 55 वर्षांपुढील मंडळी, लहान मुलं, गर्भवती महिला भगिनी यांची विशेष काळजी घेऊन आपल्याला पुन्हा काम-धंदा सुरू करावा लागणार आहे. आपल्यातील अनेक बांधवांचं पोट हातावर आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवश्यक ती दक्षता घेऊन काम सुरू करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणूनच मीही लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी व ते सोडवण्यासाठी बाहेर पडलोय.
---------------
ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतायेत; आता घराबाहेर पडा
---------------
काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 
---------------
आता हेच पहा ना! डॉक्टर, नर्स, पोलीस, अँबुलन्स चालक, पॅरामेडिकल स्टाफ हे गेल्या तीन महिन्यांपासून दिवस-रात्र सेवा करतायेत. त्यांच्या या कामाचं कौतुक कितीही केलं तरी कमी आहे. म्हणून या कोरोना योध्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कृतज्ञतेची थाप टाकण्यासाठी मी त्यांना भेटायला जात असतो. या कोरोना योध्यांना भेटून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते, त्यांच्या अडचणी समजून घेता येतात, त्यातील शक्य त्या अडचणी लगेच सोडवण्याचा प्रयत्न करता येतो आणि आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, या भावनेने त्यांनाही काम करण्यास दुप्पट हुरूप येतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दररोज जिवाची लढाई असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या या कोरोना योध्यांना पाहून कोणत्याही कठीण प्रसंगात काम करण्याची ताकद मला मिळते. त्यासाठीच तर मी मुंबईत केईएम हॉस्पिटलसह इतरही कोविड केअर सेंटरला भेट दिली. पुण्यात ससून हॉस्पिटल, महापालिकेचं नायडू हॉस्पिटल व अन्य कोविड केअर सेंटरला भेट देऊन तिथल्या कोरोना योध्यांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव जाणून घेतले. विशेष म्हणजे एकाही कोविड योध्यांने माझ्याकडं तक्रारीचा पाढा वाचला नाही. काही कमतरता असेल तर त्याची पूर्तता सरकारकडून लवकरच होईल, असा सकारात्मक आशावाद त्यांच्या बोलण्यातून जाणवला. हे सर्वजण अभावाचं भांडवल करत रडत बसणारे नाहीत तर आहे त्या साधनांच्या साह्याने लढणारे वीर आहेत. त्यांची ही जिद्द पाहून माझ्याच अंगावर मूठभर मांस आल्यासारखं वाटतं.

म्हणून शक्य तेवढी काळजी घेऊनच मी घराबाहेर पडतो. तुम्हीही घराबाहेर पडा आणि कामाला सुरुवात करा. कारण आपल्यापुढं खूप मोठं आर्थिक संकट येऊन थांबलंय. भविष्यात ते आणखी कसं वळण घेईन हे कुणीही सांगू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा... चुकूनही त्याकडं दुर्लक्ष करू नका ती गोष्ट म्हणजे... तुम्ही जशी माझी काळजी करताय ना तशीच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. तुम्ही एवढं जरी केलं तरी मला खूप आनंद होईल माझ्या भावांनो आणि बहिणींनो!

आपण काळजी घ्यायला कमी पडलो तर नाईलाजाने पुण्यासारखा लॉक डाऊनचा निर्णय घेण्याची वेळ येते. शेवटी हाही निर्णय आपल्या हितासाठीच घेण्यात आलाय. पण कितीही नाही म्हणलं तरी यामुळं हातावर पोट असलेल्या वर्गाला फटका बसतो. पण नाईलाज असतो. म्हणून आपण सगळ्यांनीच अधिक जबाबदारीने योग्य काळजी घेतली तर कोणाला त्रास होणार नाही व आपल्या अर्थकारणाची गाडीही एका जागी रुतून बसणार नाही असा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT