पुणे

खोपोडीचे रोकडोबानाथ

CD

शिरूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरती पारगाव केडगावदरम्यान खोपोडी हे अवघे १००० लोकवस्तीचे गाव वसले आहे. गावाला खूप मोठा इतिहास आहे. मूळचे देऊळगाव गाडा येथील असणारे शितोळे कुटुंबीय व निंबूत येथील असणारे गरदडे कुटुंबीय उदरनिर्वाहानिमित्त गावामध्ये आले. पूर्वी या गावांमध्ये सशाच्या आकाराच्या मातीच्या व खडकाच्या खोपा होत्या. म्हणून गावाला खोपोडी नाव पडले. गावामध्ये ग्रामदैवत रोकडोबानाथ मंदिर, खंडोबा मंदिर व हनुमान मंदिर ही महत्त्वाची मंदिरे आहेत. १९७४ला पाया घेतलेले खंडोबा मंदिर २०१८मध्ये पूर्ण झाले.

गावाभोवती काटेरी झुडपे होती, गावामध्ये एक साधू आले. या साधूंचे अनेक शिष्य बनले. त्यांच्या दर्शनासाठी परिसरातून हजारो भाविक यायचे. या साधूंनी जिवंत समाधी घेतली. या खोपा काढून गाव वसवल्याने या गावाला खोपोडी असे नाव पडले, असे जाणकार सांगतात. पूर्वी खोपोडी ही पारगावची वाडी म्हणून प्रसिद्ध होती. ग्रुप ग्रामपंचायत असल्याने वेगवेगळ्या व्यवहारानिमित्त या ग्रामस्थांना पारगावला जावे लागायचे. परंतु, १९९२ ला स्वतंत्र खोपोडी ग्रामपंचायत मंजूर झाली. माजी सरपंच राजेंद्र शितोळे यांच्या काळामध्ये गावाला आर. आर. पाटील तंटामुक्ती पुरस्कार, हागणदारीमक्त पुरस्कार व आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले आहेत. याच काळामध्ये हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. छोटे नागोबाचे मंदिर आहे. येथे दरवर्षी नागपंचमीला महिला आवर्जून येतात व नागोबाची पूजा करतात.

यात्रेत कार्यक्रमांनी रंगत
दरवर्षी चैत्र षष्ठीला ग्रामदैवत रोकडोबानाथ देवाची यात्रा भरते. यावेळी ग्रामस्थ स्वतः वर्गणी देतात. देवाचा अभिषेक, विधिवत पूजा, देवाचा छबिना, लोकनाट्य तमाशा आणि कार्यक्रमांनी यात्रेची रंगत वाढते. गावामध्ये खोपोडी सोसायटी असून या सोसायटीवरती गावचे अर्थकारण अवलंबून आहे.

लोकवर्गणीतून मंदिराचे काम होणार
जिल्हा परिषद शाळा, पोस्ट ऑफिस, अंतर्गत रस्ते, गटारे योजना, पाणीपुरवठा योजना, रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे गावच्या वैभवामध्ये भर घालत आहेत. ग्रामदैवत असलेल्या रोकडोबानाथ मंदिरासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी १९ लाख रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक रमेश अप्पा थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी शेळके यांनी गावच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. गावच्या सरपंच वैशाली गरदडे असून लवकरच लोकवर्गणीतून ग्रामदैवत रोकडोबानाथाचे मंदिर होणार असल्याची माहिती माजी उपसरपंच प्रफुल्ल शितोळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT