RTE admission sakal
पुणे

RTE Admission : आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी पाचऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अंतर्गत बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना पुरेसा अवधी मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश व्हावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेस २३ ते ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेचा आढावा घेतला असता या प्रवेशासाठी मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे दिसून आले.

त्यामुळे एक ते पाच ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी देण्यात आलेली मुदतवाढ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करावेत. तसेच यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी अशी स्पष्ट सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

SCROLL FOR NEXT