RTE Admission Maharashtra : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांकरिता दरवर्षी उपलब्ध जागांच्या दुप्पट, तिप्पट अर्ज येतात. परंतु यंदा राज्य सरकारने प्रवेशप्रक्रियेत बदल केल्याने प्रतिसाद अल्प मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी राज्यात तब्बल आठ लाख ८६ हजार ४११ जागा उपलब्ध आहेत, पण रविवारी दुपारपर्यंत केवळ पाच टक्के म्हणजेच ४६ हजार ५१५ अर्ज आले आहेत.
‘आरटीई’नुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद होती. आता नव्या निर्णयानुसार संबंधित मुला-मुलींच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर स्वंयअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश मिळेल.
म्हणजेच आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल तर त्या खासगी शाळेत राखीव जागांवर प्रवेश दिला जाणार नाही हे अधोरेखित करण्यात आले आहे. त्यानुसार सध्याची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.अर्ज भरण्याची मुदत येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) आहे.
१० पेक्षाही कमी अर्ज : सिंधुदुर्ग, ७५ पेक्षाही कमी अर्ज : गडचिरोली
२०० पेक्षाही कमी अर्ज : हिंगोली, नंदूरबार, रत्नागिरी,
५०० पेक्षाही कमी अर्ज : अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, परभणी, रायगड, सांगली, वर्धा, वाशीम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.