पुणे : शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीआे) सर्व प्रकारचे कामकाज येत्या शुक्रवारपासून (ता. 19) पासून सुरू होणार आहे. त्यामुळे लर्निंग लायसनही नागरिकांना मिळू शकेल आणि पर्मनंट लायसनचीही परीक्षा सुरू होणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनामुळे देशात 25 मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आरटीओचेही कामकाज तेव्हापासून बंद होते. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर 18 मे पासून आरटीओचे कामकाज काही प्रमाणात सुरू झाले. तेव्हापासून फक्त नव्या वाहनांची नोंदणी सुरू होती. या पार्श्वभूमीवर राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, आरटीओचे कामकाज 19 जूनपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शुक्रवारपासून कामकाज सुरू करण्यासाठी 20 टक्के अधिकारी, कर्मचाऱयांना कामावर बोलविण्यात येईल. त्यासाठी आज आणि उद्या सलग बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...म्हणून पुण्यात सहा मीटरच्या रस्त्यांवर टीडीआर नको
शुक्रवारपासून आरटीआेमधील लर्निंग लायसन, पर्मनंट लायसन, वाहन नोंदणी, वाहन ट्रान्स्फर, फिटनेस सर्टिफिकिट, कर भरणा, फॅन्सी नंबर लिलाव, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट आदी विविध प्रकारची कामे सुरू होणार आहेत. त्यात लर्निंग लायसनची परीक्षा घेताना दोन उमेदवारांत 6 फुटांचे अंतर असेल. तसेच संगणक आणि संबंधित उपकरणे प्रत्येक वेळी सॅनिटाईज केली जातील. गर्दी होऊ नये, यासाठी अपॉइंटमेंटची काटेकोर अंमलबजावणी करणे आदी विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, अशीही माहिती शिंदे यांनी दिली. मास्क आणि ग्लोव्हज नसेल तर, आरटीआेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?
आरटीआेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडावे, यासाठी प्रवेशद्वारापासूनच उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकही नियुक्त केले जातील. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर उपाययोजना करण्यात येतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड आणि बारामती आरटीआेचेही कामकाज काही प्रमाणात सुरु झाले असून तेथेही अल्पावधीतच पूर्ण क्षमतेने काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.