Mahametro  sakal
पुणे

Pune Mahametro : रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे मेट्रोचा मार्ग आखणी विस्तारित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्ग बुधवारी (ता. ६) सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या मार्गाचे उद्घघाटन करण्यात आले.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या या मार्गामुळे वनाजवरून नगर रस्त्यावरील रामवाडीला जाण्यासाठी मेट्रोने फक्त ३६ मिनिटे लागणार आहे. या प्रवासासाठी ३० रुपये भाडे आकारले जात आहे. खासदार वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, रवी धंगेकर, सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाचे मुद्दे -

- वनाज ते रामवाडी प्रवासाचे अंतर - ३६ मिनीट

- मार्गाचे एकूण अंतर - १४.५ किलोमीटर

- मेट्रोचे तिकीट - ३५ रुपये

- किती तास मेट्रो धावणार - १६ तास

- मेट्रो स्थानकांची संख्या - १६

- स्थानकांची नावे - वनाज, आनंदनगर, आयडल कॉलनी, नळ स्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमपी, जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्टेशन, रूबी हॉल, बंडगार्डन, येरवडा (अद्याप काम सुरू आहे), कल्याणीनगर आणि रामवाडी.

मेट्रोची वारंवारिता -

  • सकाळी ६ ते सकाळी ८

  • सकाळी ११ ते दुपारी ४

  • रात्री ८ ते रात्री १० (दर १० मिनिटांनी)

  • सकाळी ८ ते सकाळी ११

  • दुपारी ४ ते रात्री ८ (७.५ मिनिटांनी)

प्रवासी १५ हजारांनी वाढणार -

रामवाडीवरून प्रवाशांना पिंपरी-चिंचवड, वनाजपर्यंत जाता येणार आहे. तसेच शहराच्या मध्य भागात पोचण्यासाठी शिवाजीनगर, महापालिका भवन, डेक्कन जिमखाना, संभाजी पार्क आदी स्थानकांवरही उतरता येईल. यामुळे नव्या मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत किमान १५ हजारांनी वाढ होणार आहे.

रामवाडी ते विमानतळ ‘मेट्रो फिडर सेवा’ -

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) प्रवाशांच्या सोयीकरिता बुधवारपासून रामवाडीपासून ‘मेट्रो फिडर बससेवा’ सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे प्रवासी नागरिकांना रामवाडी मेट्रो स्थानकापर्यंत पोचणे सोयीचे होणार आहे. साकोरेनगर आणि संजय पार्क लेन नंबर ६ अशा दोन मार्गावरून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. दर २५ मिनिटांनी रामवाडीवरून विमानतळासाठी बस असणार आहे.

अशी आहे ‘मेट्रो फिडर सेवा’ -

  • बसची संख्या - २

  • मार्ग - साकोरेनगर आणि संजय पार्क लेन नंबर ६

  • बसची वारंवारता - दर २५ मिनिटांनी

  • भाडे - ५ ते १० रुपये (अंतरानुसार)

‘मी गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेते. विमानगरमधून थेट कॉलेजपर्यंत मार्ग सुरू न झाल्याने मी बसने प्रवास करीत होते. मात्र आता मला माझ्या घरापासून जवळ असलेल्या स्थानकापासून थेट कॉलेजजवळ उतरता येणार आहे. त्यामुळे हा मार्ग माझ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे,’ अशी भावना व्यक्त केली कल्याणी साठे या विद्यार्थिनीने.

रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मार्गाच्या उद्घाटनानंतर तिने मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी तीने मेट्रोचा काय फायदा झाला असे विचारले असता ही भावना व्यक्त केली. साडेचार किलोमीटरचे अंतर असलेला हा मार्ग बंडगार्डन, नगर रस्ता, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी या भागातील प्रवाशांना डेक्कन आणि कोथरूडला जाण्यासाठी सोर्इचा ठरणार आहे. तसेच कर्वे रस्ता, पौड रस्ता या मार्गांवर असलेल्या प्रवाशांना रामवाडीकडे जाणे मेट्रोद्वारे जलद आणि सोपे होणार आहे.

विस्तारित मार्गामुळे मला कोथरूडवरून बंडगार्डनला जाणे सोपे होणार आहे. नोकरीच्या निमित्ताने मला सतत येरवड्याला जावे लागते. आत्तापर्यंत मी पीएमपी किंवा खासगी वाहनाने तिकडे जात. मात्र आता मला माझ्या ऑफीस जवळून बंडगार्डनसाठी मेट्रो उपलब्ध झाली आहे. त्यामुळे माझा प्रवास आता आधीच्या तुलनेत सोपा झाला आहे.

- अभिषेक रेणुसे, नोकरदार प्रवासी

पुणेकरांच्या रोषामुळे ऑनलाइन उद्घाटन -

रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाच्या लोकार्पणामुळे पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मार्ग तयार होऊनही पुणेकरांच्या वाहतूक त्रासाकडे डोळे झाक करीत याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधानांना बोलावून मोठा इव्हेंट करण्याचा भाजपचा मनसुबा होता. मात्र पुणेकरांच्या तीव्र रोषामुळे अखेरीस भाजपला ऑनलाइन लोकार्पणावरच समाधान मानावे लागले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यानिमित्ताने म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT