sagar-bhandari 
पुणे

...अन्‌ चेतला प्लाझ्मादानाचा यज्ञकुंड!;२१६ जणांना जीवदान

संजय नवले

पुणे - कोण कोरोनाशी लढत होतं, तर कोण रुग्णशय्येवर पडून त्याच्याशी झुंज देत होतं. मृत्यूच्या दारापर्यंत पोहचलेल्यांत कुठं घरातला कर्ता पुरुष होता, तर कुठं कोणाची मायबहीण. त्यांना तेथून परत आणायचंय... पण कसं? या प्रश्‍नावर एकच उत्तर होतं, ते म्हणजे ‘प्लाझ्मा’!

या अत्यवस्थ रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी तरुणाईची एक फळी हिरिरीनं उभी राहिली. मुंढव्यातील रूपा फाउंडेशनच्या छत्राखाली ती एकवटली अन्‌ रात्रीचा दिवस करीत त्यांनी प्लाझ्मादानाचा यज्ञकुंड चेतवला. कोरोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्यांचा शोध घेऊन त्यांना प्लाझ्मादानासाठी प्रवृत्त करणं, हे एक आव्हानच! पण, हे आव्हान या तरुणाईनं स्वीकारत तब्बल दोनशे सोळा जणांना प्लाझ्मादान केलं.  

याबाबत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भंडारी म्हणाले, ‘‘कोरोनानं अनेकांचा मृत्यू होत असताना फाउंडेशनच्या माध्यमातून खासगी, सरकारी रुग्णालयांतून कोरोनावर मात केलेल्यांची यादी गोळा केली. त्यांच्याशी व्यक्तिशः संपर्क साधून, त्यांना प्लाझ्मादानाचे महत्त्व पटवून दिले. शंभर जणांशी संपर्क साधल्यावर त्यातील पाच ते दहा जण होकार द्यायचे; पण आम्ही धीर सोडला नाही. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीनुसार आम्ही आमचे कार्य सुरूच ठेवले. त्यातून दोनशे सोळा जणांना आम्ही प्लाझ्मा देऊ शकलो. यासाठी ऋषी साबळे, दीपक पाटील, सुरेश सपकाळ, रवींद्र खैरे आदींचे सहकार्य लाभले.’’ 

रक्त असो प्लाझ्मा, हे कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडील आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असा अथवा गरीब, मात्र प्लाझ्मा हा सर्वांसाठी एक समानच आहे. या कार्यात बरे- वाईट अनुभव मिळाले. अनेकांचे आशीर्वाद, शुभेच्छा मिळाल्या. एखाद्याचे प्राण वाचवतानाचे समाधान अवर्णनीय असून ज्यांना प्लाझ्मा हवा आहे, अशा गरजवंतांनी ९७६७८०४२८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे भंडारी यांनी आवाहन केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना बाधित झाल्याने माझ्या पतीला प्लाझ्माची गरज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. नेमकी कोणाकडे मदत मागावी, काहीच कळत नव्हते, अशावेळी सागर भंडारी आणि त्यांचे सहकारी देवासारखे आमच्या मदतीला धावून आल्याने कोरोनावर मात करणे शक्‍य झाले. 
- आरती गिरीश भालेराव, केडगाव

माझे वडील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असताना प्लाझ्मासाठी शोधाशोध सुरू होती, मात्र अशा या संकटकाळी रूपा फाउंडेशनच्या माध्यमातून प्लाझ्मा उपलब्ध झाल्याने त्यांना पुनर्जन्म लाभला. 
- मोनाली जगताप-धारवाडकर, मांजरी

फाउंडेशनचे  सामाजिक उपक्रम
रूपा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रमात सातत्यानं सहभाग, लॉकडाउनच्या काळात ४०० गरजवंतांना धान्यकिटचं वाटप, रिक्षा चालकांना धान्य, मास्क वाटप, रोटरी क्‍लब व फाउंडेशनच्या सहयोगातून ५०० सॅनिटायझर बॉटलचं वाटप, गरीब व्यक्तींना हॉस्पिटल प्रवेशासाठी मदत, तसेच  खिळेविरहित झाडं, असे अनेक उपक्रम फाउंडेशननं राबविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT