Milk sakal
पुणे

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली.

नवनाथ भेके

निरगुडसर - राज्य सरकारने घोषित केलेल्या दूध अनुदान योजनेतून पुणे जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ९८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी ५१ लाख ६९ हजार ४७० रुपयाचे अनुदान जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा दूध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी दिली.

शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली. सदर योजना १ जुलै २०२४ पासून सुरू झाली असून सदर योजनेत पुणे जिल्ह्यातील ११८ सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे.सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांकडून पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाकडे २८९ फाईल सबमिट झाल्या आहेत.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ९८ शेतकऱ्यांना एकूण १२ कोटी ११ लाख ३८ हजार ९६५ लिटर दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे ६० कोटी ५१ लाख ७९ हजार ४७० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत,अजूनही दूध प्रकल्प कडून शेतकऱ्यांची माहिती सबमिट होत आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना देखील दुधाचे अनुदान जमा होणार आहे.

१ जुलैपासून दुग्ध व्यवसाय विकास विभागामार्फत ही दूध अनुदानाची योजना राबवण्यात येत आहे.१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यासाठी सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे.१ ऑक्टोबर २०२४ पासून प्रतिलिटर दोन रुपये वाढ करून शेतकऱ्यांना प्रतीलिटर सात रुपये अनुदान मिळणार आहे.

जिल्हा दूध विकास अधिकारी सतीश डोईफोडे म्हणाले की, १ ऑक्टोबरपासून दुधाच्या अनुदानात वाढ झाली असून यापूर्वी मिळणारे पाच रुपये अनुदानात दोन रुपये वाढ करून सात रुपये प्रति लिटर अनुदान दिले जाणार आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी,दूध प्रकल्पांनी माहिती यापुढेही तात्काळ द्यावी त्यामुळे दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास विलंब होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT