Sabudana Sakal
पुणे

नवरात्रीच्या उपवासामुळे साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीला मागणी

नवरात्रीचे उपवास सुरू झाल्याने बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, भगरची मागणी वाढली आहे.

प्रवीण डोके

नवरात्रीचे उपवास सुरू झाल्याने बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, भगरची मागणी वाढली आहे.

पुणे - नवरात्रीचे उपवास सुरू झाल्याने बाजारात साबूदाणा, शेंगदाणा, भगरची मागणी वाढली आहे. मागणी वाढली असली तरी साबुदाणा क्विंटलमागे ५०० रूपयांनी स्वस्त झाला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत भगरीच्या भावात 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. मागिल वर्षी भगरीला घाऊक बाजारत किलोस 70 रुपये भाव मिळत होता. तो यंदा 110 ते 115 रुपयांवर पोहचला आहे.

मागील काही दिवसात शेंगदाण्याचे भाव स्थिर आहेत. तर हायजॅनिक फुड म्हणून नागरिक भगरीला खाण्यास पसंती देत असल्यामुळे भाव तेजीत आहेत. देशात तामिळनाडुतील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणाचे उत्पादन घेतले जाते. तेथून संपूर्ण देशात साबुदाणा विक्रीसाठी जातो. यंदा उत्पादकांनी अचानकपणे साबुदाण्याचे भाव वाढविले होते. मात्र, मागणी घटल्याने भाव कमी करण्यात आले आहेत. पंधरा दिवसात किलोच्या भावात तब्बल 15 रुपयांनी घसरण झाली आहे. बाजारात सध्या दररोज 100 ते 110 टन साबुदाण्याची आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी दिली.

शेंगदाण्याचे भाव स्थिर

शेंगदाण्याची कर्नाटक आणि गुजरात येथून नवीन मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, साध्य ही आवक कमी आहे. पुढील काही दिवसात आवक वाढेल. त्यामुळे नवरात्रीनंतर भावात घट होण्याची शक्‍यता आहे.

हवामानामुळे भगरीच्या उत्पादनात घट

लहरी हवामानामुळे यंदा भगरीच्या उत्पादनात घट झाले आहे. हायजॅनिक फुड म्हणून दक्षिण भारतातील लोक भगर खातात. त्यामुळे भगरीचे भाव तेजीत आहेत. तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून भगरीच्या कच्च्या मालाची आवक होते. तेथून नाशिक जिल्ह्यातून प्रक्रीया करून माल येथील मार्केट यार्डत दाखल होत असतो. दररोज सुमारे 100 टन भरीची आवक होत आहे.

नवरात्रामुळे भगर, राजगिरा व साबुदाण्याला चांगली मागणी आहे. वाढत्या महागाईच्या काळात यंदा पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. आठवडाभरात साबुदाण्याच्या भावात क्विंटलमागे पाचशे रुपये घट झाली आहे.तर अन्य जिन्नसांचे दर स्थिर आहेत.

- आशिष दुगड, व्यापारी, मार्केट यार्ड.

घाऊक बाजारातील दर्जानुसार किलोचे दर

प्रकार -- घाऊक दर

  • भगर -- 106 ते 115

  • साबुदाणा -- 65 ते 74

  • शेंगदाणा -- 100 ते 125

  • राजगिरा -- 100 ते 108

पिठांचे दर

प्रकार -- घाऊक दर

  • राजगिरा -- 130 ते 150

  • शिंगाडा -- 180 ते 200

  • साबुदाणा -- 70 ते 80

  • भगर -- 90 ते 140

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT