पुणे - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांच्या मागील बाजूस मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकतीच दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली असून, या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करणेबाबत आदेश दिले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात. रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स मागील बाजूस बसविणे बंधनकारक असून त्याबाबत केंद्र सरकारनेही आदेश दिले आहेत. या आदेशाबाबत काहीहि शंका असल्यास dytcenfl.tpt-mh@gov.in किंवा dycommr.enfl@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes)आणि रियर मार्किंग प्लेट / टेप चा वापर करणे खालील प्रकारच्या सर्व वाहनांवर बंधनकारक आहे. दुचाकी वाहने, 3.5 टन (GVW) पर्यंत क्षमतेची मालवाहू वाहने (तीनचाकी वाहनांसह), 3.5 टन ते 7.5 टन क्षमता असलेली मालवाहू वाहने, 7.5 टन क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली मालवाहू वाहने, 8 पर्यंत आसन क्षमतेची (मोटार कार, ओमानी बस इ.) प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन (GVW)पर्यंत क्षमतेची प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन पेक्षा जास्त (GVW)क्षमतेची प्रवासी वाहने, ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंम्बाईन हार्वेस्टर, एन संवर्गातील प्राईम मुव्हरला जोडलेले ट्रेलर व सेमी ट्रेलर, बांधकाम साहित्य वाहुन नेणारी वाहने आणि मॉड्यूलर हायड्रॉलिक ट्रेलर अशा सर्व वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचेच परावर्तक रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसवावेत, असे आवाहन ढेकणे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.