Anniversary-Day-Special 
पुणे

नियोजन, तंत्रज्ञानाला महत्त्व

पीतांबर लोहार

पिंपरी - ‘‘विकासकामांचे नियोजन करणे, नागरिकांच्या गरजेनुसार सोयीसुविधा पुरवणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे हे तीन घटक स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहेत. सध्या या तीनही घटकांवर आधारित स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी उपक्रमात झालेला आहे. मात्र, स्मार्ट सिटी म्हणजे काय? याबाबत अनेक नागरिकांच्या मनात प्रश्‍नचिन्ह आहेत. 

त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘स्मार्ट म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर, आयटी क्षेत्राचा प्रभाव असे नाही. मात्र, तंत्रज्ञान हा स्मार्ट सिटीचा एक भाग निश्‍चितपणे आहे. त्याच्याकडे व्यापक अर्थाने पाहायला हवे. त्यासाठी स्मार्ट सिटी म्हणजे काय? हे जाणून घेतले पाहिजे. 

स्मार्ट सिटीत नियोजन, नागरिक आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव होतो. त्याच दिशेने सध्या काम सुरू आहे.’’

नियोजन
नियोजन हा स्मार्ट सिटीचा पहिला भाग आहे. शहरात विकसित झालेल्या जुन्या भागासह नवीन भागसुद्धा नियोजनबद्धपणे विकसित झाला पाहिजे. कारण, काही भाग नियोजनाच्या अगोदरच विकसित झालेला असतो. त्यामुळे शहर अस्ताव्यस्त दिसते. तो सुस्थितीत आणणे आवश्‍यक असते. त्यासाठी चांगले नियोजन करणे महत्त्वाचे असते. शहरातील जलवाहिन्या, रस्ते यांसह बऱ्याचशा गोष्टी नियोजनात येतात. 

नागरिक
नागरिकांना चांगलं जीवन जगता यावे, हाही भाग स्मार्ट सिटीचा आहे. चांगल्या आयुष्यासाठी नागरिकाला काय पाहिजे? त्या गोष्टी स्मार्ट सिटीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. केवळ नोकऱ्या मिळवून देणे, हा स्मार्ट सिटीचा उद्देश नाही. कारण, नोकरीची संधी असेल तिथे लोक जात असतात. कामाव्यतिरिक्तच्या वेळातून त्याला सामाजिक संबंधांचे दृढीकरण करून आनंददायी जीवन जगता आले पाहिजे. 

तंत्रज्ञान
तंत्रज्ञान हा स्मार्ट सिटीतील तिसरा भाग आहे. नागरिकांना सुरक्षित जीवन जगता आले पाहिजे. घरबसल्या सर्वसेवा मिळाल्या पाहिजे. कामाचे ठिकाण घरापासून जवळ असावे. मिळकत कर अथवा अन्य व्यवहार घरबसल्या करता आले पाहिजेत. घडामोडी नागरिकांना बसल्या जागी कळाव्यात. माहिती एका क्‍लिकवर मिळावी, हे सर्व घडवून आणण्यासाठी स्मार्ट सिटी काम करते आहे.

नियोजन, नागरिक आणि टेक्‍नॉलॉजी या तिन्ही गोष्टींच्या अनुषंगाने शहरात स्मार्ट सिटी संकल्पना राबवायची आहे. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या शहर अपडेट करणे आणि नागरिकांची सुरक्षितता उपलब्ध करून देणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT